प्रसार भारतीतील काजोलचे स्थान डळमळीत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 14:05 IST2017-05-22T08:35:14+5:302017-05-22T14:05:14+5:30
अभिनेत्री काजोल हिच्या प्रसार भारतीच्या बैठकांना उपस्थित न राहिल्याचे प्रकरण जोर धरू लागले आहे. होय, बैठकांना अनुपस्थित राहणाºया काजोलची ...

प्रसार भारतीतील काजोलचे स्थान डळमळीत!!
अ िनेत्री काजोल हिच्या प्रसार भारतीच्या बैठकांना उपस्थित न राहिल्याचे प्रकरण जोर धरू लागले आहे. होय, बैठकांना अनुपस्थित राहणाºया काजोलची कार्यकारी मंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
आॅल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या कामाचे पर्यवेक्षण करणाºया कार्यकारी मंडळाच्या सदस्यांमध्ये गेल्या वर्षी काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर काजोलने प्रसार भारतीच्या बैठकांना उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण काजोल वर्षभरात झालेल्या लागोपाठ तीन बैठकांना गैरहजर होती. याविषयी तिने कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. गत आठवड्यात प्रसार भारती बोर्डाची बैठक झाली. यावेळी काही सदस्यांनी काजोलच्या सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहण्याचा मुद्दा उचलून धरला. शिवाय काहींनी याप्रकरणी कारवाई करण्याचीही मागणी केली. त्यामुळे प्रसार भारतीतील काजोलचे स्थान डळमळीत झाले आहे. प्रसार भारती कायद्यातील तरतुदींनुसार, बोर्डाच्या सलग तीन बैठकांना परवानगी न घेता अनुपस्थित राहणाºया सदस्याला पदत्याग करावा लागतो. काजोलने शेवटच्या सभेला उपस्थिती लावली होती की नाही हे जाणून घेण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसार भारतीला एक पत्र पाठवले आहे. काजोलच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी काजोलची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पण व्यावसायिक जबाबदारी आणि घरगुती कारणांमुळे काजोलला शेवटच्या ३-४ बैठकांना उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, त्याआधीच्या बैठकांमध्ये ती न चुकता उपस्थित राहिली होती. सध्या परिस्थिती तिच्या हाताबाहेर असल्यामुळे तिला बैठकीला उपस्थित राहता आले नाही, याबद्दल काजोल दिलगीर आहे.
ALSO READ : ‘बीफ’ व्हिडिओ शेअर करून भलतीच फसली काजोल!
काजोल सध्या ‘व्हीआयपी2’ या चित्रपटात बिझी आहे. यात चित्रपटात काजोल आणि साऊथ सुपरस्टार धनुष पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दिग्दर्शित करते आहे.