प्रभास म्हणतो, आता तर मलाही माझ्यात व अनुष्कात काहीतरी आहे असे वाटू लागलेयं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 13:06 IST2017-10-03T07:36:34+5:302017-10-03T13:06:34+5:30

‘बाहुबली2’ रिलीज झाल्यानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्याबद्दलची प्रत्येक लहान-सहान बातमी जाणून घेण्यास चाहते उत्सूक आहेत. यावेळी आम्ही तुमच्यासाठी ...

Prabhas says, now I have thought that there is something in me and in captivity! | प्रभास म्हणतो, आता तर मलाही माझ्यात व अनुष्कात काहीतरी आहे असे वाटू लागलेयं!

प्रभास म्हणतो, आता तर मलाही माझ्यात व अनुष्कात काहीतरी आहे असे वाटू लागलेयं!

ाहुबली2’ रिलीज झाल्यानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्याबद्दलची प्रत्येक लहान-सहान बातमी जाणून घेण्यास चाहते उत्सूक आहेत. यावेळी आम्ही तुमच्यासाठी अशीच एक धमाकेदार बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी आहे, प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्यांबद्दल. होय, अलीकडे एका मुलाखतीत प्रभासने एक मोठ्ठा खुलासा केला आहे. त्याचा खुलासा चांगलाच अवाक् करणारा आहे.
‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या पसरल्या. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगली. खरे तर झाले-गेले काहीच नाही. पण तरिही लिंकअपच्या बातम्या थांबल्या नाहीच. आता तर या बातम्या, चर्चा ऐकून ऐकून प्रभासही गोंधळला आहे. त्याच्यात अन् अनुष्कामध्ये खरोखरचं काहीतरी आहे, असे त्याला वाटू लागलेय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. ताज्या मुलाखतीत खुद्द प्रभासनेच हे म्हटलेय.
अनुष्कासोबतच्या लिंकअपबाबत त्याला प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न ऐकून प्रभास गालातल्या गालात हसायला लागला. ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास यावर बोलला. अर्थात प्रभात हे सगळे गमतीगमतीत  बोलला. पण कोण जाणो, प्रभासच्या या गमती-गमतीतील बोलण्यात खरे सत्य दडले असावे. अनुष्का केवळ माझी चांगली मैत्रिण असल्याचे प्रभास सध्या सांगतोय. पण उद्याचे भविष्य कुणी पाहिले? 

ALSO READ : OMG! ‘बाहुबली’ प्रभासला आला ‘अ‍ॅक्शन’चा कंटाळा! वाचा सविस्तर...!!

सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटासाठीही अनुष्का शेट्टी व प्रभास या दोघांचेच नाव चर्चेत होते. पण अखेर अनुष्काऐवजी ‘साहो’मध्ये श्रद्धा कपूरची वर्णी लागली. त्यामुळे पुढच्या चित्रपटात प्रभास श्रद्धा कपूरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. अर्थात यामुळे अनुष्का व त्याच्या लिंकअपच्या बातम्या थांबतील, असा तुमचा अंदाज असेल तर तो खोटाच म्हणायला हवा. कारण अनुष्का व प्रभासची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलीय.त्यामुळे किमान दोघेही बॅचरल आहेत, तोपर्यंत तरी लिंकअपच्या बातम्यांना अंत नाहीयं.

Web Title: Prabhas says, now I have thought that there is something in me and in captivity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.