​‘Poster Boys’चा फर्स्ट लूक आऊट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 13:55 IST2016-12-12T13:55:04+5:302016-12-12T13:55:04+5:30

‘पोस्टर बॉयज’ हा मराठी सिनेमा तुफान गाजला होता. आता या सिनेमाचा याच नावाने हिंदी रिमेक येतोय. सनी देओल, बॉबी ...

'Poster Boys' First Look Out !! | ​‘Poster Boys’चा फर्स्ट लूक आऊट!!

​‘Poster Boys’चा फर्स्ट लूक आऊट!!

ोस्टर बॉयज’ हा मराठी सिनेमा तुफान गाजला होता. आता या सिनेमाचा याच नावाने हिंदी रिमेक येतोय. सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे अशी तगडी स्टारकास्ट यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, श्रेयस या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करणार आहे. म्हणजेच दिग्दर्शक म्हणून श्रेयसचा हा पहिला सिनेमा असणार आहे.

या बहुप्रतिक्षीत सिनेमातील सनी, बॉबी व श्रेयसचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. रिअल लाईफ भाऊ असलेले सनी व बॉबी या चित्रपटात एकमेकांना अनोळखी व्यक्तिंची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सनीने एका माजी लष्करी अधिकाºयाची भूमिका साकारली आहे. या माजी अधिकाºयाला सेल्फिचे प्रचंड वेड असते. चित्रपटात सनी कुर्ता, जॅकेट आणि डोक्यावर फेटा अशा वेशात दिसणार आहे. बॉबी या चित्रपटात एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शुद्ध हिंदी बोलणारा शिक्षक बॉबी यात रंगवणार आहे. शुद्ध हिंदी सोबतच या चित्रपटात त्याचा अवतारही शुद्ध देसी आहे. मिशी आणि डोळ्यावर चष्मा अशा वेशात तो या चित्रपटात दिसणार आहे. याऊलट श्रेयस यात एका चित्रपट वेड्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुरूषांच्या नसबंदीला प्रोत्साहन देणाºया एका पोस्टरमध्ये हे तिघे झळकतात आणि मग काय धम्माल उडते, ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सोनाली कुलकर्णी हिने यात सनीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.पुण्याजवळच्या भोर येथे नुकतेच या चित्रपटाच्या शूटींगचे पहिले शेड्यूल संपल्यानंतर चित्रपटाची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.

 हा चित्रपट तीन हमालाच्या सत्यकथेवर आधारित आहे. २०१४ मध्ये मराठीत ‘पोस्टर बॉयज’ आला होता व तो हिट झाला होता.

Web Title: 'Poster Boys' First Look Out !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.