​पूनम पांडेचे सिक्रेट प्रोजेक्ट काय असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 12:42 IST2017-04-12T07:12:57+5:302017-04-12T12:42:57+5:30

पूनम पांडे आणि वाद यांच्यात खूप जवळचे नाते आहे. पूनम नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानामुळे किंवा फोटोंमुळे चर्चेत असते. आता ...

Poonam Pandey's secret project? | ​पूनम पांडेचे सिक्रेट प्रोजेक्ट काय असणार?

​पूनम पांडेचे सिक्रेट प्रोजेक्ट काय असणार?

नम पांडे आणि वाद यांच्यात खूप जवळचे नाते आहे. पूनम नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानामुळे किंवा फोटोंमुळे चर्चेत असते. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील पूनमचा बोल्ड अंदाज पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या फोटोत ती अर्धनग्न असून तिने तिच्या शरीराचा वरचा भाग केसाने झाकलेला आहे. अशाप्रकारचे बोल्ड फोटो पूनमने पोस्ट करणे यात काही नवीन नाही. पण या फोटोसोबत तिने एक कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनची चांगलीच चर्चा होत आहे. या फोटोसोबत तिने पूनम पांडेचे सिक्रेट प्रोजेक्ट लवकरच तुमच्या भेटीला येणार असे म्हटले आहे. 
पूनमचे सिक्रेट प्रोजेक्ट येणार असे तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यापासूनच या कमेंटवर अनेकजणांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पूनम पांडे नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत असते. या फोटोंमध्ये तिच्या बोल्ड फोटोंची संख्या अधिकाधिक असते. त्यामुळे तिच्या अकाऊंटला अनेकजण फॉलो करतात. आता तिने इन्स्टाग्रामला ही पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. पूनम तिच्या बोल्ड फोटोंमुळेच नावारूपाला आली आहे. त्यामुळे याच संबंधित तिचे काहीतरी नवीन प्रोजेक्ट असेल अशी चर्चा रंगली आहे.
पूनमचे सिक्रेट प्रोजेक्ट काय असणार? याबाबत तिच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या तिच्या फोटोवर अनेकांनी कमेंटदेखील दिले आहेत. ती आता काय काय करू शकते यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. आता पूनमचे सिक्रेट प्रोजेक्ट काय आहे हे केवळ तीच सांगू शकते. पूनम तिच्या सिक्रेट प्रोजेक्टची लवकरच घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. 



Web Title: Poonam Pandey's secret project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.