पूनम पांडे इन हॉरर मुव्ही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 19:21 IST2016-04-15T02:21:05+5:302016-04-14T19:21:05+5:30
वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांड पुन्हा एकदा चर्चेत आहे, ती तिच्या येऊ घातलेल्या सिनेमामुळे. होय, पूनम पांडे पुन्हा एका चित्रपटात ...
.jpg)
पूनम पांडे इन हॉरर मुव्ही!
व दग्रस्त अभिनेत्री पूनम पांड पुन्हा एकदा चर्चेत आहे, ती तिच्या येऊ घातलेल्या सिनेमामुळे. होय, पूनम पांडे पुन्हा एका चित्रपटात दिसणार आहे. मात्र हा चित्रपट हॉरर चित्रपट असणार आहे. पण थांबा, हा बॉलिवूडपट नाही तर एक कन्नड सिनेमा आहे. खुद्द पूनमनेच याबाबत माहिती दिली. मुंबईत एका डायरेक्टरने मला त्याची स्क्रिप्ट ऐकण्याची गळ घातली. मी स्क्रिप्ट ऐकल्यावर मला ती इतकी आवडली की, मी लगेच या चित्रपटासाठी होकार दिला, असे पूनम म्हणाली. माझ्या करिअरमधील ही माझी पहिली हॉरर मुव्ही आहे, त्यामुळे मी अतिआनंदात आहे. याच महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असेही तिने सांगितले. या चित्रपटात पूनम पांडे अतिशय घाबरवणाºया गेटअपमध्ये दिसणार आहे. ‘नशा’मध्ये बोल्ड रूपात दिसल्यानंतर तसेही पूनमच्या हाताला काम नव्हते. आता हॉरर तर हॉरर...काम तर आहे ना, तेव्ही बेस्ट लक पूनम!!