पूनम पांडेने या अभिनेत्याविरोधात दाखल केली विनयभंगाची तक्रार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:38 IST2017-10-05T05:08:54+5:302017-10-05T10:38:54+5:30
कित्येक हॉट आणि सेक्सी व्हिडीओमुळं इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी मॉडेल म्हणजे पूनम पांडे. सोशल मीडियावर कायमच या ना त्या कारणामुळं ...
.jpg)
पूनम पांडेने या अभिनेत्याविरोधात दाखल केली विनयभंगाची तक्रार !
क त्येक हॉट आणि सेक्सी व्हिडीओमुळं इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी मॉडेल म्हणजे पूनम पांडे. सोशल मीडियावर कायमच या ना त्या कारणामुळं चर्चेत राहणारी पूनम पांडे. आता हीच पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. पूनम पांडेनं आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. एका व्यक्तीकडून मानसिक छळ सुरु असल्याचा दावा करत सेक्सी पूनम पांडे थेट पोलीस ठाण्यात पोहचली आहे. राजीव खन्ना नावाचा अभिनेता आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवत असून लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देत असल्याची तक्रार पूनम पांडे हिने केली आहे. इतकंच नाही तर पूनमने या अभिनेत्याविरोधात चक्क विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून राजीवचं आपल्यावर लक्ष असतं असंही पूनमनं म्हटलं आहे. पूनमच्या या तक्रारीची पोलिसांनीही गंभीर दखल घेतल्याचं आता समोर आलं आहे. पूनमच्या तक्रारीनुसार अभिनेता राजीव खन्नाला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. स्ट्रीप क्वीन, वादग्रस्त, सेक्स सायरन असं जिच्याबद्दल बोललं जातं ती म्हणजे पूनम पांडे. स्वतःचे हॉट व्हिडीओ अपलोड करुन पूनम पांडे हिनं सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घातला आहे. 2011 साली टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकल्यास न्यूड होणार असल्याचंही तिनं जाहीर केलं होतं. त्यावेळी मात्र विवस्त्र होण्याऐवजी पूनमने अर्धनग्न फोटो प्रसिद्ध केले होते. याशिवाय पूनम पांडेनं लग्नाआधीच अबॉर्शन केल्याची चर्चाही रंगली होती. मुंबईतल्या एका बड्या हॉस्पिटलमध्ये अबॉर्शन केल्याचंही समोर आलं होतं. पूनमच्या या सगळ्याच गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा पूनम पांडे तिच्या या अभिनेत्या विरोधातील तक्रारीमुळे चर्चेचा विषय बनली आहे.
पूनम तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. हॉट व्हिडीओ आणि फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून ती खळबळ उडवून देत असते. तसेच यासाठी तिने एक अॅपही बनवले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पूनमने तिचा एक बोल्ड फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘तुम्ही मला डान्स करताना बघू इच्छिता काय? तर मग माझ्या संपर्कात राहा...’ त्याचबरोबर पूनमने हे देखील सांगितले होते की, तिचा लवकरच एक नवा म्युझिक व्हिडीओ येणार असून, त्याचे टायटल ‘पेज टू पेज’ असे असणार आहे.