पूनम पांडेचं ३२व्या वर्षी कॅन्सरने निधन; मॉडेलच्या इन्स्टा पेजवरच मृत्यूची पोस्ट, मॅनेजरनं दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 11:51 AM2024-02-02T11:51:36+5:302024-02-02T11:57:32+5:30

पूनम पांडेचं निधन झालं आहे. कॅन्सरने तिचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

poonam pandey dies at 32 due to cancer instagram post goes viral | पूनम पांडेचं ३२व्या वर्षी कॅन्सरने निधन; मॉडेलच्या इन्स्टा पेजवरच मृत्यूची पोस्ट, मॅनेजरनं दिला दुजोरा

पूनम पांडेचं ३२व्या वर्षी कॅन्सरने निधन; मॉडेलच्या इन्स्टा पेजवरच मृत्यूची पोस्ट, मॅनेजरनं दिला दुजोरा

सोशल मीडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. ती ३२ वर्षांची होती. कॅन्सरने तिचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

आज सकाळी पूनमच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या निधनाबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये तिचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं आहे. "आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण होती. आपल्या सर्वांची लाडकी पूनम पांडेंचा सर्व्हिकल कॅन्सरने निधन झालं आहे, हे सांगण्यात आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. या काळात आम्हाला एकांताची गरज आहे", असं पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. पूनमच्या निधनाच्या वृत्ताला तिच्या मॅनेजरनेही दुजोरा दिला आहे. झूम टीव्हीशी बोलताना त्यांनी कॅन्सरने मॉडेलचं निधन झाल्याचं सांगितलं आहे.

पूनमने २०१३ साली नशा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने अनेक सिनेमांतही काम केलं आहे. सोशल मीडियावर तिचे १.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. अनेकदातिच्या व्हिडिओमुळेही पूनम चर्चेत असायची.तिच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
 

Web Title: poonam pandey dies at 32 due to cancer instagram post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.