पूजा पुनरागमनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 06:23 IST2016-02-24T13:23:16+5:302016-02-24T06:23:16+5:30

चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री पूजा भट्ट सुमारे १८ वर्षांनंतर अभियनाच्या जगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. पिता महेश भट्ट यांनी ...

Pooja ready to come back | पूजा पुनरागमनासाठी सज्ज

पूजा पुनरागमनासाठी सज्ज

त्रपट निर्माती आणि अभिनेत्री पूजा भट्ट सुमारे १८ वर्षांनंतर अभियनाच्या जगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. पिता महेश भट्ट यांनी लिहिलेल्या पटकथेवर आधारित चित्रपटातून पूजा कमबॅक करणार आहे.
४३ वर्षीय पूजाने  आपल्या पित्याच्याच दिग्दर्शनाखाली आलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. १९८९ मध्ये आलेल्या चित्रपटाची कथा एका तरूण मुलीभोवती गुंफलेली होती.  प्रेमाच्या जोरावर पित्याचे दारूचे व्यसन ती सोडवते. पूजाचा आगामी चित्रपट मात्र यापेक्षा एकदम विरूद्ध आहे. खुद्द पूजानेच ही माहिती दिली. मी पुन्हा एका चित्रपटात अभिनय करणार आहे. हा चित्रपट ‘डॅडी’सारखा असला तरी त्याच्या एकदम विरूद्ध आहे.  माझा आगामी चित्रपट एका महत्त्वाकांक्षी महिलेबद्दल आहे. स्वत:चे करिअर, पैसा व प्रसिद्धीसाठी ही महिला आपल्या मुलीलाही दूर लोटते. जेव्हा तिला आपण खूप काही गमावून बसल्याचे जाणवते, तेव्हा ती मद्याच्या आहारी जाते, अशी ही कथा आहे, असे पूजाने सांगितले.


Web Title: Pooja ready to come back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.