पूजा भट्ट प्रेमात??
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 20:10 IST2016-03-29T03:10:28+5:302016-03-28T20:10:28+5:30
अभिनेत्री,मॉडेल, निर्माती-दिग्दर्शिका अशा सर्व भूमिकेत लिलया वावरणारी पूजा भट्ट प्रेमात पडल्याची खबर आहे. सिने दिग्दर्शक महेश भट्ट यांची थोरली ...

पूजा भट्ट प्रेमात??
अ िनेत्री,मॉडेल, निर्माती-दिग्दर्शिका अशा सर्व भूमिकेत लिलया वावरणारी पूजा भट्ट प्रेमात पडल्याची खबर आहे. सिने दिग्दर्शक महेश भट्ट यांची थोरली मुलगी असलेल्या पूजाला १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाने अपार प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ‘सडक’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘चाहत’ या चित्रपटात ती दिसली. त्यानंतर मात्र दिग्दर्शन आणि निर्माण याच कामात तिने स्वत:ला झोकून दिले. हीच पूजा आता प्रेमात पडल्याची बातमी आहे. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा ी७ ूङ्मल्ल३ी२३ंल्ल३ आसिफ आझीम याच्यासोबत पूजा डेट करीत असल्याची बातमी आहे. मूळचा बांगलादेशचा असलेला आसिफ एक लोकप्रीय मॉडेल आहे. अलीकडे तो टॉप मॉडेल कॅन्डीस पिन्टो हिच्याशी डेट करताना दिसला. पण आता आसिफ पूजाच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची बातमी आहे.