पूजा भट हूबेहूब दिसते तिच्या आईसारखी, पहा या मायलेकीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:41 AM2019-09-21T11:41:32+5:302019-09-21T11:41:57+5:30

पूजा अगदी हूबेहूब तिच्या आईसारखीच दिसते.

Pooja Bhatt And Her Mother Could Have Passed Off As Identical Twins. This Throwback Pic Is Proof | पूजा भट हूबेहूब दिसते तिच्या आईसारखी, पहा या मायलेकीचा फोटो

पूजा भट हूबेहूब दिसते तिच्या आईसारखी, पहा या मायलेकीचा फोटो

googlenewsNext

पूजा भटने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते. तिने दिल है के मानता नही, सडक, जुनून, बॉर्डर, जख्म यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत तिने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. पूजा अगदी हूबेहूब तिच्या आईसारखीच दिसते. पूजाने सोशल मीडियावर तिच्या आई व भावासोबतचा फोटो शेअर केले आहेत.

पूजाने आपल्या आईसोबतचे बरेचसे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती अगदी आईसारखी दिसते.

 पूजा आणि राहूल ही महेश भट व त्यांची पहिली पत्नी किरणची मुलं आहेत. महेश भट यांनी वीसाव्या वर्षी १९६८ साली लॉरेन ब्राईटसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांचं नाव बदलून किरण ठेवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार महेश भट यांचं अभिनेत्री परवीन बाबींसोबत अफेयर असल्याचं समजल्यावर किरण यांच्यासोबतचं नातं संपुष्ठात आलं.


१९८६ साली महेश भट यांनी अभिनेत्री सोनी राजदानसोबत लग्न केलं. या दोघांना शाहीन व आलिया या दोन मुली आहेत. आलिया भट सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने राझी, हायवे, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया व उडता पंजाब यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. 


तर पूजाने १९९० साली डॅडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.त्यानंतर तिने सडक, दिल है की मानता नहीं या चित्रपटात काम केलं. तसंच तिने २००३ साली पाप या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं.

Web Title: Pooja Bhatt And Her Mother Could Have Passed Off As Identical Twins. This Throwback Pic Is Proof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.