'पोन्नियिन सेल्वन २' फेम चियान विक्रमला रिहर्सल करताना झाली मोठी दुखापत, प्रकृतीबद्दल मॅनेजरनं दिली अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 05:43 PM2023-05-04T17:43:06+5:302023-05-04T17:43:24+5:30

Chiyaan Vikram : अभिनेत्याच्या दुखापतीच्या बातमीने त्याचे चाहते चिंतेत आहेत. तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत.

'Ponniyin Selvan 2' fame Chiyaan Vikram suffered a major injury while rehearsing, manager gave an update on his condition | 'पोन्नियिन सेल्वन २' फेम चियान विक्रमला रिहर्सल करताना झाली मोठी दुखापत, प्रकृतीबद्दल मॅनेजरनं दिली अपडेट

'पोन्नियिन सेल्वन २' फेम चियान विक्रमला रिहर्सल करताना झाली मोठी दुखापत, प्रकृतीबद्दल मॅनेजरनं दिली अपडेट

googlenewsNext

सध्या मणिरत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित 'पोन्नियिन सेल्वन २' (Ponniyan Selvan 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय, त्रिशा क्रिष्णन आणि कार्ती हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या सक्सेसचं सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या चित्रपटाची रिहर्सल करणाऱ्या चियान विक्रम(Chiyan Vikram)चा अपघात झाला. या अपघातात तो जखमी झाला आहे. 

अभिनेता चियान विक्रमचा मॅनेजर युवराजने त्याच्या अधिकृत ट्विटरवर ‘थंगालन’ चित्रपटाच्या रिहर्सल दरम्यान चियान विक्रमला दुखापत झाली आणि त्याची बरगडी फ्रॅक्चर झाल्याचे समजते आहे. अभिनेत्याच्या दुखापतीच्या बातमीने त्याचे चाहते चिंतेत आहेत. तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत.

चियान विक्रमच्या तब्येतीच्या कारणास्तव थंगालनचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. विक्रमचा मॅनेजर युवराजने ट्वीटमध्ये म्हटले की, प्रेम आणि कौतुकासाठी सर्वांचे आभार. चियान विक्रमला दुखापत झाली आहे. रिहर्सल दरम्यान त्याची बरगडी तुटली आहे, ज्यामुळे तो काही दिवस त्याच्या थंगालन युनिटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. तुमच्या प्रेमाबद्दल तो तुम्हा सर्वांचा आभारी आहे आणि लवकरात लवकर तो शूटिंगवर परतेल.

पोन्नियिन सेल्वन-२ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मणिरत्नम यांनी या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि चियान विक्रमची जोडी पाहायला मिळाली. या दोघांशिवाय या चित्रपटात कार्ती, त्रिशा कृष्णन, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, विक्रम प्रभू, जयराम आणि प्रकाश राज सारखे दमदार कलाकार आहेत.

Web Title: 'Ponniyin Selvan 2' fame Chiyaan Vikram suffered a major injury while rehearsing, manager gave an update on his condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.