पुष्पक विमानाऐवजी बाइकवर फिरणाऱ्या ‘या’ रावणाला पोलिसांनी ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 16:02 IST2017-09-29T10:32:15+5:302017-09-29T16:02:56+5:30

रामायणात आपण लंकापती रावणाचे विमान बघितले आहे. या विमानाचे नाव पुष्पक विमान होते. रावण याच विमानाने प्रवास करायचा. जेव्हा ...

The police said that the 'Pushpak' | पुष्पक विमानाऐवजी बाइकवर फिरणाऱ्या ‘या’ रावणाला पोलिसांनी ठोठावला दंड

पुष्पक विमानाऐवजी बाइकवर फिरणाऱ्या ‘या’ रावणाला पोलिसांनी ठोठावला दंड

मायणात आपण लंकापती रावणाचे विमान बघितले आहे. या विमानाचे नाव पुष्पक विमान होते. रावण याच विमानाने प्रवास करायचा. जेव्हा त्याने मॉँ सीतेचे हरण केले होते, तेव्हादेखील त्याने याच विमानाचा आधार घेतला होता, असा संदर्भ आहे. मात्र हल्लीचे रावण आधुनिक झाले आहेत. ते पुष्पक विमानाऐवजी चक्क बाइकने फेरफटका मारत आहेत. मात्र बाइकने फेरफटका मारणाºया या रावण बनलेल्या अभिनेत्याला चांगलेच महागात पडले आहे. होय, हा किस्सा काही तासांपूर्वीच घडला असून, रावण बनलेल्या या अभिनेत्याला पोलिसांचा दंड भरावा लागला आहे. 

सध्या राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लाल किल्ला येथे ‘लव-कुश रामलीला’चे आयोजन केले आहे. यावर्षी रावणाची भूमिका प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांनी साकारली आहे. सध्या मुकेश ऋषी दिल्लीत असून, रामलीलाची तयारी करीत आहेत. अशात त्यांना टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देण्यासाठी जायचे होते. ज्याकरिता त्यांनी रावणाची वेशभूषा केली होती. हॉटेलमधून ते या कॉस्ट्यूमवर बाहेर पडले. मात्र याचदरम्यान त्यांना त्यांचा एक मित्र भेटला. त्याने मुकेश यांना हार्ले डेविडसन चालविण्याचा आग्रह केला. त्यांनीदेखील लगेचच होकार देत याच कॉस्ट्यूमवर फेरफटका मारला. 

ते बाइक घेऊन इंडिया गेटकडे निघाले. पुढे राजपथवर त्यांनी बाइकची सवारी केली. रावणाला चक्क लग्जरी बाइक चालविताना बघून लोक उत्साहित झाले. काही लोकांनी तर चक्क त्यांच्याकडे धाव घेत सेल्फी आणि आॅटोग्राफचा आग्रह धरला. यावेळी मुकेश यांनी हेल्मेट घातले नव्हते. कारण त्यांच्या डोक्यावर रावणाचा मुकुट होता. मात्र याचदरम्यान गर्दीतील कोणीतरी त्यांचा एक फोटो काढला आणि वाहतूक पोलिसांना सेंड केला. मग काय, दिल्ली वाहतूक पोलिसांनी लगेचच बाइकवरील नंबर प्लेटवर चलन नोटीस पाठविले. त्यामुळे रावण बनलेल्या मुकेश यांना बाइकची सवारी चांगलीच महागात पडली. 

Web Title: The police said that the 'Pushpak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.