गायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मावशी-काकाला अटक, मावशी देखील आहे गायिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:30 PM2021-04-14T17:30:26+5:302021-04-14T17:30:48+5:30

या मुलीची मावशी, तिचा पती, त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा यांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

Playback singer's minor daughter sexually abused in Chennai | गायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मावशी-काकाला अटक, मावशी देखील आहे गायिका

गायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मावशी-काकाला अटक, मावशी देखील आहे गायिका

googlenewsNext
ठळक मुद्देहा सगळा प्रकार घडल्यानंतर ही मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने तिच्या आईला याबाबत सांगितले.

एका प्रसिद्ध गायिकेच्या 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी या मुलीच्या मावशी आणि काकासोबतच आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे. ही मुलगी सुट्टीनिमित्त तिच्या मावशीच्या घरी गेली असता हा प्रकार घडला. 

ही प्रसिद्ध गायिका काही कामानिमित्त बाहेरगावी गेली असल्याने तिने तिच्या मुलीला तिच्या बहिणीकडे काही दिवसांसाठी ठेवले होते. पण या दरम्यान मावशी, तिचा पती, त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा यांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तसेच काही स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मावशीने तिला चेन्नईतील किलपौक भागात असलेल्या चर्चमध्ये नेलं. तिथे हेन्री पॉल या पाद्रीने देखील या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. 

हा सगळा प्रकार घडल्यानंतर ही मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने तिच्या आईला याबाबत सांगितले. तिच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये या चौंघाविरोधात तक्रार नोंदवली असून पीडिता अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अल्पवयीन मुलीची मावशी गायिका तर काका संगीतकार आहे. तिची मावशी पूर्वी ऑपेरा सिंगर होती. पण काही वर्षांपूर्वी एका जीवघेण्या आजारातून ती वाचली. त्यानंतर तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि महिला पाद्री म्हणून चर्चमध्ये काम करायला सुरुवात केली. ती गायनाच्या माध्यमातून धर्मप्रचार करते. 

Web Title: Playback singer's minor daughter sexually abused in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Chennaiचेन्नई