‘फिलौरी’ मनोरंजनासह प्रबोधनात्मक चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 16:32 IST2017-03-21T11:01:53+5:302017-03-21T16:32:29+5:30

निर्माता म्हणून दुसºयांदा नशीब आजमावणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आगामी ‘फिलौरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Pioneer film with 'Fillori' entertainment !! | ‘फिलौरी’ मनोरंजनासह प्रबोधनात्मक चित्रपट!!

‘फिलौरी’ मनोरंजनासह प्रबोधनात्मक चित्रपट!!

र्माता म्हणून दुसºयांदा नशीब आजमावणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आगामी ‘फिलौरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनुष्काने वापरलेले प्रमोशनचे फंडे प्रेक्षकांना आकर्षित करणारे ठरत असल्याने हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर काय करिष्मा दाखवेल, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, चित्रपटाची कथा पंजाबच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. पंजाबी एनआरआय असलेला कानन (सूरज शर्मा) नावाचा मुलगा त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशी विवाह करण्यासाठी भारतात येतो. मात्र राशीनुसार तो मांगलिक असल्याने त्याच्या विवाहात अनेक अडचणी निर्माण होतात. अशात त्यावर तोडगा म्हणून त्याला एका झाडाशी लग्न करावे लागते. कारण त्याची मैत्रीण असलेली अनू (महरिन पिरजादा) हिला कुठल्याही प्रकारची जोखीम उचलायची नसते. काननदेखील अनुचा हा प्रस्ताव मान्य करीत त्या झाडाशी लग्न करण्यास तयार होतो. 



परंतु येथूनच चित्रपटात खरा ट्विस्ट निर्माण होतो. कारण ज्या झाडाशी कानन लग्न करतो, त्याच झाडावर शशी (अनुष्का) नावाचे भूत राहात असते. काननचे त्या झाडाशी विधिवत लग्न पार पडल्यानंतर काननच्या परिवारातील लोक ते झाड कापून टाकतात. त्यामुळे शशी नावाचे भूत बेवारस होते. काय करावे, कुठे जावे हे त्या भुताला सूचत नसल्याने शशी नावाचे भूत काननच्या आयुष्यात येते. या दरम्यान जो काही ड्रामा दाखविण्यात आला आहे, तो खूपच मजेशीर असा आहे. कारण शशी नावाचे हे भूत हानीकारक नसून, मनोरंजनात्मक आहे असेच म्हणावे लागेल. 

याच दरम्यान शशी आणि फिलौरी (दलजित दोसांझ) यांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे ‘फिलौरी’ हा पूर्णत: मनोरंजनात्मक करण्यास निर्मात्यांनी कुठलीच कसर सोडली नाही, असेच म्हणावे लागे. अनुष्काने साकारलेली भुताची भूमिका हे या चित्रपटातील खरे आकर्षण असेल. तर दलजितने अनुष्काच्या प्रियकराची भूमिका साकारून एकप्रकारे पंजाबी लग्न पद्धतीतील त्रुटीवर प्रकाश टाकण्याचाच प्रयत्न केला आहे. अनशय लाल यांनी दिग्दर्शित केलेला ‘फिलौरी’ त्यांच्या कारकिर्दीतील पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचे लेखन अनविता दत्त यांनी केले आहे. तर चित्रपटाचे निर्माते फॉक्स स्टार स्टुडिओ आणि क्लिन स्टेट फिल्मस् आहेत. अनुष्काच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत बनविण्यात आलेल्या या सिनेमात अनुष्काचा भाऊ कामेश शर्मा यानेही निर्माता म्हणून भूमिका बजावली आहे. ‘फिलौरी’ येत्या २४ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. 



#ShashiWasThere
नेहमीच्या पठडीतील चित्रपट न बनविता निर्मात्यांनी ‘फिलौरी’ हा चित्रपट मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक बनविण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. नवीन विषय घेऊन तयार केलेल्या या चित्रपटात सर्वच मसाला भरण्यात आलेला आहे. शिवाय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरण्यात आलेल्या क्लृप्त्याही चांगल्याच चर्चेत राहिल्या आहेत. प्रमोशनचा एक भाग म्हणून ‘शशी वॉज देअर’ हा हॅश टॅग वापरून शशीचे भूत कुठे कुठे उपस्थित होते, हे अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने दाखविण्यात आले आहे. त्याचबरोबर शशीचे भूत घातक की प्रेमळ याचा अंदाज बांधणेही प्रेक्षकांना शक्य होत आहे. सोशल मीडियावर तर हॅश टॅगने धूम उडवून दिली आहे. कधी आॅस्कर, कधी चंंद्रावर तर कधी चक्क ‘शोले’ या चित्रपटात वापरण्यात आलेल्या जय-वीरूच्या बाइकवर हे भूत बघावयास मिळाले आहे. त्यामुळे चित्रपटाचा प्रमोशन फंडा चांगलाच चर्चेत राहिला आहे, यात दुमत नाही. 

Web Title: Pioneer film with 'Fillori' entertainment !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.