संजय कपूरच्या पत्नीने शेअर केलेल्या ‘या’ फोटोंमुळे करिश्मा कपूरचा झाला संताप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 19:44 IST2018-01-17T14:07:07+5:302018-01-17T19:44:37+5:30
२००५ यावर्षी संजय कपूर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरने न्यायालयाकडून तिच्या दोन्ही मुलांची कस्टडी घेतली. आता करिश्मा तिचे ...

संजय कपूरच्या पत्नीने शेअर केलेल्या ‘या’ फोटोंमुळे करिश्मा कपूरचा झाला संताप?
२ ०५ यावर्षी संजय कपूर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरने न्यायालयाकडून तिच्या दोन्ही मुलांची कस्टडी घेतली. आता करिश्मा तिचे स्वतंत्र आयुष्य जगत असून, मुलांना ती अधिकाधिक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा प्रत्यय तिचे सोशल मीडिया अकाउंट बघून येतोच. कारण ती नेहमीच मुलांसोबतचे फोटो तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करीत असते. मात्र काही दिवसांपूर्वी असे काही घडले जे बघून करिश्माचे चाहते नक्कीच आश्चर्य व्यक्त करतील.
![]()
त्याचे झाले असे की, करिश्माचे दोन्ही मुले पापा संजय कपूरकडे काही काळ व्यतीत करण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. यावेळी संजय कपूरची दुसरी पत्नी प्रिया सचदेव हिने संजय आणि करिश्माची मुलगी समायरा आणि मुलगा कियानसोबतचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले.
![]()
फोटोमध्ये समायरा तिच्या पापासोबत बसलेली दिसत असून, तिच्या चेहºयावरील आनंद स्पष्टपणे झळकत आहे. प्रियाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘#Twosday The perfect twosday post! Loving, doting, caring and an amazing father... #fatherdaughter #fatherandson #fatheranddaughter #twosdaytuesday #twosdays #twosday #twosda #twosday #twosdayvibe.’ असे लिहिले. समायराने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे.
![]()
तर दुसºया एका फोटोत कियान पापा संजयच्या कपड्यांची कॉपी करताना दिसत आहे. कारण दोघांनीही एकसारखाचा काळ्या रंगाचा कोट आणि खाकी पॅण्ट घातलेली आहे. दरम्यान, संजय कपूर आणि करिश्मा कपूरचे वैवाहिक जीवन खूपच वादग्रस्त ठरले आहे. कारण घटस्फोटापर्यंत त्यांच्यातील वाद बघावयास मिळाला. अखेर हे दोघे विभक्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. संजय कपूरने लगेचच लग्न केले असून, करिश्मा कपूरही नवा संसार थाटण्याच्या तयारीत आहे. अशात हे बघून तिचा संताप झाला नसेल तरच नवल.