संजूबाबाने पोस्ट केलेत असे फोटो की सगळ्यांनाच बसला धक्का!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 21:15 IST2016-08-02T15:45:10+5:302016-08-02T21:15:10+5:30
अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेला मुन्नाभाई अर्थात संजय दत्तने नुकताच स्वत:चा ५७ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा ...

संजूबाबाने पोस्ट केलेत असे फोटो की सगळ्यांनाच बसला धक्का!!
अ ैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेला मुन्नाभाई अर्थात संजय दत्तने नुकताच स्वत:चा ५७ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याच्या भरात संजयने पत्नी मान्यताचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि हे फोटो पाहून सगळ्यांचीच बोटं तोंडात गेलीत. होय, या फोटोंमध्ये मान्यताने एका रायफलसोबत पोझ दिली आहे. आता लगेच भलता सलता विचार करू नका. ही रायफल म्हणजे खरीखुरी रायफल नसून एक लँप आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर हा एक गन शेप लँप आहे. हे फोटो पाहून काही नेटीजन्स संजयची टर उडवतांनाही दिसले. संजयचे शस्त्र प्रेम अजूनही कायम आहे, अशा शब्दांत नेटीजन्सनी संजयची टर उडवली.
![]()
![]()