PHOTOS: ब्रेकअपनंतर विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडने बिचवर केले फोटोशूट, दिसली स्टनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:00+5:30

हरलीन सेठीने नुकतेच इंस्टाग्रामवर बिचवरील फोटोशूट शेअर केले आहे.

PHOTOS: Vicky Kaushal's ex girlfriend Harleen Sethi done photoshoot after breakup | PHOTOS: ब्रेकअपनंतर विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडने बिचवर केले फोटोशूट, दिसली स्टनिंग

PHOTOS: ब्रेकअपनंतर विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडने बिचवर केले फोटोशूट, दिसली स्टनिंग

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल काही महिन्यांपूर्वी चित्रपटांसोबतच त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आला होता. एका मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले गेले होते. ब्रेकअपनंतर आता हरलीनचे बिचवरील फोटोशूट केल्याचे समोर आले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 

हरलीन सेठीने नुकतेच इंस्टाग्रामवर बिचवरील फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये ती मस्तीच्या अंदाजात दिसते आहे. काही फोटोंमध्ये ती बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे. मात्र हे फोटोशूट कुठे केले आहे, ते समजू शकलेलं नाही.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार विकीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हरलीन डिप्रेशनमध्ये गेली आहे. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी हरलीन कुटुंबीयांसोबत जास्ती जास्त वेळ घालवतेय.

रिपोर्टनुसार हरलीन लवकरच डिप्रेशनमधून बाहेर येईल. कॅटरिना कैफसोबत विकीच्या वाढत्या जवळीकीमुळे हरलीन दुखावली आणि तिने विकीसोबत ब्रेकअप केले. तेव्हापासून कॅट व विकी यांच्या ऑफस्क्रिन रोमान्सच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चेत किती तथ्य आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही.


हरलीन म्हणाली की, खरे सांगू मला या गोष्टीचा अजिबात त्रास झाला नाही. मात्र माझे कुटुंब व मित्रांना खूप त्रास झाला. प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख असते. या गोष्टीमुळे मी स्वत:ला कमी लेखत नाही आहे. मी एका स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि मी आतापर्यंत एकही सिनेमा केलेला नाही यामुळे मी अजिबात स्वत:ला कमी लेखत नाही. मी स्वत:वर प्रेम करते. मला लोकांनी हरलीन सेठी म्हणूनच ओळखावे. त्यामुळे एखाद्याला माझा एक्स बॉयफ्रेंड म्हणणे चुकीचे ठरेल.


तर हरलीन सेठी काही महिन्यांपूर्वी वेब सीरिज ब्रोकन अँड ब्युटिफूल २मध्ये दिसली होती.

यातील तिच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते.

 

Web Title: PHOTOS: Vicky Kaushal's ex girlfriend Harleen Sethi done photoshoot after breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.