PHOTO VIRAL : सलमान खान-कॅटरिना कैफ 'या' महालात करत आहेत रोमांस!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 18:59 IST2017-03-19T13:22:20+5:302017-03-19T18:59:52+5:30

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ यांच्यात पुन्हा एकदा रोमांस सुरू झाल्याच्या बातम्या पुढे येत ...

PHOTO VIRAL: Salman Khan-Katrina Kaif 'is doing' Mahal 'Romance !! | PHOTO VIRAL : सलमान खान-कॅटरिना कैफ 'या' महालात करत आहेत रोमांस!!

PHOTO VIRAL : सलमान खान-कॅटरिना कैफ 'या' महालात करत आहेत रोमांस!!

लिवूडचा सुलतान सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ यांच्यात पुन्हा एकदा रोमांस सुरू झाल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. सध्या हे कपल आॅस्ट्रिया येथे त्यांच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, याच दरम्यान त्यांच्यात पुन्हा एकदा जवळीकता निर्माण झाली आहे. याचा पुरावा म्हणून सोशल मीडियावर सध्या एका आलिशान महालाचा फोटो व्हायरल झाला असून, त्याठिकाणी सलमान आणि कॅटरिना रोमांस करीत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे या महालाच्या फोटोविषयी उत्सुकता निर्माण झाली असून, प्रत्येकाच्या मनात या महालाविषयीच्या प्रश्नांचे काहूर माजले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या महालाच्या फोटोमागचे खरे वास्तव सांगणार आहोत. 

#TigerZindaHai Katrina Kaif & Salman Khan shot at the Goldenes Dachl in Old Town Innsbruck yesterday pic.twitter.com/QesTgXvuAT— Katrina Kaif Online (@KatrinaKaifFB) March 18, 2017}}}} ">http://


दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमासाठी सलमान, कॅटरिनासह सिनेमाची संपूर्ण टीम सध्या आॅस्ट्रिया येथे आहे. त्यातच एका महालाचा फोटो व्हायरल झाल्याने सलमान-कॅटरिनामधील रोमांसच्या चर्चांना अक्षरश: ऊत आला आहे. जेव्हा आम्ही या फोटोचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो फोटो म्हणजे सिनेमाचे सेट नसून, आइन्सबर्ग येथील प्रसिद्ध वास्तू आहे. या वास्तूला ‘गोल्डन रूफ’च्या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे ही वास्तू सिनेमाचा भाग बनणार असल्याने सलमानसह सर्व टीम सध्या याठिकाणी तळ ठोकून आहे. या वास्तूचा फोटो कॅटरिनाच्या एका फॅनने शूटिंग सुरू होण्याअगोदरच काढला होता. आता तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



पण काहीही असो या फोटोमुळे कॅटरिनाच्या फॅन्ससह सलमानचे फॅन्स जबरदस्त उत्साहात आहेत. पर्यायाने यामुळे सिनेमाचे जबरदस्त प्रमोशनही होत आहे. हा सिनेमा सलमान आणि कॅटरिनाच्या पहिल्या ‘एक था टायगर’चा सिक्वल आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करीत आहेत. सलमानचा ‘ट्यूबलाइट’ यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर क्रिसमसला ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा प्रसिद्ध होणार आहे. 

Web Title: PHOTO VIRAL: Salman Khan-Katrina Kaif 'is doing' Mahal 'Romance !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.