​photo shoot : ‘मुबारकां’च्या रिलीजपूर्वी दिसली अर्जुन कपूर व अथिया शेट्टीची ‘हॉट केमिस्ट्री’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 15:55 IST2017-07-05T10:25:38+5:302017-07-05T15:55:38+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच ‘मुबारकां’ घेऊन येत आहेत. होय, ‘मुबारकां’ या आगामी चित्रपटात अर्जुन ...

Photo shoot: Arjun Kapoor and Athiya Shetty's hot chemistry before 'Mubarak' release! | ​photo shoot : ‘मुबारकां’च्या रिलीजपूर्वी दिसली अर्जुन कपूर व अथिया शेट्टीची ‘हॉट केमिस्ट्री’!!

​photo shoot : ‘मुबारकां’च्या रिलीजपूर्वी दिसली अर्जुन कपूर व अथिया शेट्टीची ‘हॉट केमिस्ट्री’!!

लिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच ‘मुबारकां’ घेऊन येत आहेत. होय, ‘मुबारकां’ या आगामी चित्रपटात अर्जुन व अथिया या दोघांचा आॅनस्क्रीन रोमान्स तुम्ही -आम्ही बघू शकणार आहोत. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट या महिन्याच्या अखेरिस रिलीज होतो आहे. त्यामुळे तूर्तास चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.  याच प्रमोशनला आणखी गरमागरम तडका देण्यासाठी अर्जुन व अथियाने एक हॉट फोटोशूट केले आहे. अर्थात हे फोटोशूट एका मॅगझिनसाठी आहे. पण शेवटी हाही प्रमोशन फंडाच.





अर्जुन व अथियाने या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. हे फोटो बघता, चित्रपटातही त्यांची अशीच जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळणार, हे नक्की. तसेही काही दिवसांपूर्वी अर्जुन व अथियाच्या रिलेशनशिपच्या बातम्यांनी जोर धरला होता. आता या बातम्यात किती तथ्य ते ठाऊक नाही.  या फोटोशूटमधून तुम्हालाच काही तथ्य सापडत का ते बघा!




ALSO READ :  ‘मुबारकां’चे मिका सिंहच्या आवाजातील ‘हवा हवा...’ गाणे ऐकाच!

काही दिवसांपूर्वी ‘मुबारकां’चा ट्रेलर लॉन्च झाला होता. ट्रेलरवरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती, ती म्हणजे यात खूप सारी कॉमेडी आणि तेवढेच कन्फ्युजन असणार आहे. यात अर्जुन कपूर डबररोलमध्ये आहे. एक ‘पगडी’ लूकमध्ये आणि एक ‘पगडी’शिवाय असे त्याचे दोन अवतार आपल्याला यात पाहायला मिळणार आहेत.  विशेष म्हणजे, पुतण्यासाठी अर्जुनचा काका अनिल कपूर मैदानात उतरला आहे. या चित्रपटात अनिलचा कॉमिक टायमिंग अफलातून आहे. अनिल व अर्जुन हे दोघेही प्रथमच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अथियाशिवाय इलियाना डिक्रूज ही सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. 

Web Title: Photo shoot: Arjun Kapoor and Athiya Shetty's hot chemistry before 'Mubarak' release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.