आलिया भट्ट आणि वरुण धवनचा हा फोटो होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 12:25 IST2017-10-04T06:55:41+5:302017-10-04T12:25:41+5:30

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या जोडीने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण 3 चित्रपट एकत्र झळकले होते. हे तिन्ही चित्रपट ...

This photo of Alia Bhatt and Varun Dhawan is Viral | आलिया भट्ट आणि वरुण धवनचा हा फोटो होतेय व्हायरल

आलिया भट्ट आणि वरुण धवनचा हा फोटो होतेय व्हायरल

ुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या जोडीने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण 3 चित्रपट एकत्र झळकले होते. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. चित्रपटाच्या मेकर्स त्यांना एकत्र घेऊन पुढे ही आणखीन नवे चित्रपट तयार करण्याची इच्छ आहे. मात्र सध्या दोघेही आपआपल्या कामात बिझी आहेत. अशातच धर्मा प्रोडक्शनने ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.  

हा फोटो कोणत्या चित्रपटाच्या सेटवरचा नसून एका अॅड फिल्मसाठीचा आहे. नुकतेच आलिया आणि वरुणने एका अॅडसाठी शूट केले. ज्याचा फोटो धर्मा प्रोडक्शनने शेअर केला. फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन ही दिले आहे. 'क्या आप वारिया फील के लिए तयार है?'  वरुणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.  या फोटोत वरुण काउबॉयच्या लूकमध्ये दिसतो आहे. तर आलिया रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. वरुण आणि आलियाने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ते हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया सारख्या चित्रपटात एकत्र झळकले होते. 


ALSO READ :  सरकारी रुग्णालयात आईसोबत दिसली आलिया भट्ट; काय झाले असेल आलियाला?

सध्या वरुण धवन बॉक्स ऑफिसचा राजा बनला आहे. नुकताच त्याचा जुडवा 2 चित्रपट रिलीज झाला आहे. जुडवा2 बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करेल अशी आशा वाटते आहे. तर सध्या आलिया भट्ट मेघना गुलजारच्या राजी चित्रपटात दिसणार आहे. नुकताच तिने याचित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. राजी हा एक थ्रिलर चित्रपट आहे. ज्याची निर्मिती करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन करते आहे. यात ती एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. ज्याची विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे.  

Web Title: This photo of Alia Bhatt and Varun Dhawan is Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.