Phillauri : अनुष्का शर्मा म्हणतेय, मी भुतांचे चांगले प्रतिनिधित्व केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 21:35 IST2017-03-08T16:01:41+5:302017-03-08T21:35:00+5:30

सध्या अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, चांगलीच चर्चेत आली आहे. स्वत:च्या बॅनरअंतर्गत निर्मित केलेल्या ...

Phillauri: Anushka Sharma says, I made good representation of ghosts | Phillauri : अनुष्का शर्मा म्हणतेय, मी भुतांचे चांगले प्रतिनिधित्व केले

Phillauri : अनुष्का शर्मा म्हणतेय, मी भुतांचे चांगले प्रतिनिधित्व केले

्या अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, चांगलीच चर्चेत आली आहे. स्वत:च्या बॅनरअंतर्गत निर्मित केलेल्या ‘फिलौरी’ या दुसºया सिनेमात अनुष्का एका भुताच्या रूपात नवरीची भूमिका साकारत आहे. अनुष्काने सिनेमातील तिच्या याच भूमिकेचा धागा पकडून प्रमोशनसाठी असे काही फंडे वापरले आहेत की, त्यामुळे तिचा हा भुताचा लूक पडद्यावर बघण्यास प्रेक्षक आतुर झाले आहेत. त्याचबरोबर अनुष्काच्या मनातही अक्षरश: लड्डू फुटत असून, चक्क मी भुतांचे चांगले प्रतिनिधित्व केल्याचे तिचे म्हणणे आहे. 

गेल्या मंगळवारी एका न्यूज एजन्सीला मुलाखत देताना अनुष्काने म्हटले की, भुताची भूमिका साकारताना मी खूप एन्जॉय केला. खरं तर प्रत्येक कलाकाराला काही तरी नवे करावेसे वाटते. मी ही भूमिका साकारून खरोखरच आनंदी आहे. पुढे बोलताना अनुष्काने चक्क भुतांच्या समुदायाचे मी चांगले प्रतिनिधित्व केल्याचे म्हटले. ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया अनुष्काने अगदी कमी कालावधीत स्वत:ला सिद्ध केले आहे. इंडस्ट्रीमध्ये तिने बड्या स्टार्ससोबत काम केले असून, तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. शिवाय तिच्या बॅनरअंतर्गत निर्मित करण्यात आलेला पहिला ‘एनएच-१०’ या सिनेमानेही बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. 



आता ती ‘फिलौरी’मधून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहे. या सिनेमासाठी तिने प्रमोशनचे अनेक मजेशीर फंडे वापरले आहेत. जगभरातील काही आयकॉनिक घटना आणि सिनेमांच्या फोटोंमध्ये स्वत:च्या भूमिकेचा फोटो कोलार्ज करून तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘शोले’पासून ते ‘आॅस्कर’ अवॉर्डमध्ये स्वत:ची उपस्थिती दाखवून प्रेक्षकांना लोटपोट केले आहे. 

अनशाई लाल दिग्दर्शित या सिनेमात दिलजीत दोसांझ याचीही प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा येत्या २४ मार्च रोजी रिलिज होणार असून, तिचे प्रमोशन फंडे प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडतील हे लवकरच स्पष्ट होईल. पण काहीही असो अनुष्काने प्रमोशनसाठी वापरलेले फंडे प्रेक्षकांची चांगलीच करमणूक करणारे ठरले हे मात्र नक्की. 

Web Title: Phillauri: Anushka Sharma says, I made good representation of ghosts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.