‘जय गंगाजल’साठी ‘फँटम फिल्म्स’ने मागितले १ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 19:19 IST2016-08-14T13:49:10+5:302016-08-14T19:19:10+5:30
‘फँटम फिल्म्स’मुळे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. झा यांनी विनाअधिकार ‘जय गंगाजल’ हा चित्रपट बनवल्याचा आरोप ‘फँटम ...

‘जय गंगाजल’साठी ‘फँटम फिल्म्स’ने मागितले १ कोटी
‘ ँटम फिल्म्स’मुळे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. झा यांनी विनाअधिकार ‘जय गंगाजल’ हा चित्रपट बनवल्याचा आरोप ‘फँटम फिल्म्स’ने केला आहे. शिवाय यासाठी १ कोटी रूपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. विकास बहल, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधू मंटेना यांची संयुक्त मालकी असलेल्या ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने यासंदर्भात झा यांना नोटीस बजावले आहे. आमच्याकडे २००३ मध्ये झा दिग्दर्शित आणि निर्मित ‘गंगाजल’चा आयपीआर (बौद्धिक संपदा अधिकार) आणि सीक्वल तसेच मूळ चित्रपटावर आधारित चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे. असे असताना ‘पीजेपी’ या झा यांच्या प्रॉडक्शन हाऊसने आमची परवानगी न घेता विनापरवानगी ‘गंगाजल’चा सीक्वल साकारला, असा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. ‘जय गंगाजल’ तयार झाला असल्याने झा यांनी नुकसानभरपाईपोटी सात दिवसांच्या आत १ कोटी रुपए द्यावेत. अन्यथा आम्ही पुढील कायदेशीर कारवाई मार्गाचा अवलंब करू,असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.