‘पेशवा बाजीराव’ ने माझे आयुष्यच बदलले - रणवीर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 16:46 IST2016-12-20T16:37:58+5:302016-12-20T16:46:01+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ च्या माध्यमातून बॉलिवूडला अभिमान वाटावा अशी कलाकृती निर्माण केली. रणवीर सिंग - ...

Peshwa Bajirao changed my life - Ranveer Singh | ‘पेशवा बाजीराव’ ने माझे आयुष्यच बदलले - रणवीर सिंग

‘पेशवा बाजीराव’ ने माझे आयुष्यच बदलले - रणवीर सिंग

ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ च्या माध्यमातून बॉलिवूडला अभिमान वाटावा अशी कलाकृती निर्माण केली. रणवीर सिंग - दीपिका पादुकोण - प्रियांका चोप्रा यांनी पेशवा बाजीराव-मस्तानी - काशीबाई यांच्या केलेल्या भूमिका अविस्मरणीय आहेत. या कलाकृतीला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. रणवीरने केलेली  पेशवा बाजीरावची भूमिका ही त्याच्यासाठी आयुष्य बदलणारी होती, असे तो सांगतो.
                                     

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी ‘बाजीराव मस्तानी’ अगोदर ‘रामलीला’ चित्रपटात एकत्र दिसली होती. त्यांच्या या जोडीला मिळालेल्या चाहत्यांच्या असंख्य हिट्समुळे त्यांची ‘बाजीराव मस्तानी’तील जोडी अविस्मरणीय आहे. यात दीपिकाने केलेली मस्तानीची भूमिका, प्रियांकाने केलेली काशीबाईची भूमिका या भूमिका त्यांच्यासाठी आदर्श भूमिका ठरल्या.  चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याने या सर्वांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया आणि आनंद व्यक्त केला आहे.

                          

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे सध्या बिगबजेट ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून, प्रियांका ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘पद्मावती’ चित्रपटामुळे रणवीर सिंग-दीपिका पादुकोण-संजय लीला भन्साळी हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र आलेय. चित्रपटातील त्यांच्या लूकबद्दल प्रचंड गॉसिप ‘बी टाऊन’ मध्ये होत आहे.

                                     

Web Title: Peshwa Bajirao changed my life - Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.