आलियाच्या जवळच्या व्यक्तीने कापले तिचे केस; नेटिझन्स म्हणाले,‘तो रणबीर तर नाही?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 19:15 IST2020-05-17T19:14:47+5:302020-05-17T19:15:29+5:30

तिने अशातच तिच्या फिटनेसविषयी एक पोस्ट केली आहे. तिने फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘६० दिवसांचे चॅलेंज मी पूर्ण केले. मी आता पहिल्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि फिट झाली आहे. मी बर्पिस करू शकते, पुश अप्स चांगले करतेय, रनिंग आता मला आवडू लागलीय, माझे डाएट व्यवस्थित सुरू आहे.’

A person close to Alia cut her hair; Netizens said, "Isn't he Ranbir?" | आलियाच्या जवळच्या व्यक्तीने कापले तिचे केस; नेटिझन्स म्हणाले,‘तो रणबीर तर नाही?’

आलियाच्या जवळच्या व्यक्तीने कापले तिचे केस; नेटिझन्स म्हणाले,‘तो रणबीर तर नाही?’

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीही घरी बसून आहेत. विरंगुळा म्हणून ते त्यांचे रोजच्या अ‍ॅक्टिव्हिटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मात्र, यात बॉलिवूडची एक अभिनेत्री सध्या तेवढी अ‍ॅक्टिव्ह नाहीये. ती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुम्हाला सांगू इच्छितो की, ती अभिनेत्री म्हणजे आलिया भट. पण, तिने अशातच एक फोटो पोस्ट केलाय, ज्यात तिने केस कापलेले दिसत आहेत. तिला नेटिझन्सनी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे.

आलिया भट हिला लॉकडाऊनमध्ये राहून ६० दिवस झालेत. तिने अशातच तिच्या फिटनेसविषयी एक पोस्ट केली आहे. तिने फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘६० दिवसांचे चॅलेंज मी पूर्ण केले. मी आता पहिल्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि फिट झाली आहे. मी बर्पिस करू शकते, पुश अप्स चांगले करतेय, रनिंग आता मला आवडू लागलीय, माझे डाएट व्यवस्थित सुरू आहे.’

आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोत तिचे केसही बरेच कमी झाल्याचे समजतेय. तिने पोस्टमध्ये लिहिलेय की,  घरीच मी माझे केस कापले आहेत. एका जवळच्या व्यक्तीने माझे केस कापल्याने मी त्या व्यक्तीचे आभार मानते. त्या मल्टी टॅलेंटेड व्यक्तीने केस कापून माझी मदतच केली आहे.’

आलियाच्या या पोस्टवर नेटिझन्स खुप प्रश्न विचारत आहेत. ‘तो जवळचा व्यक्ती रणबीर तर नाही?’ असे एका युजरने विचारले. अजून बºयाच युजर्सनी या फोटोला कमेंटस दिल्या आहेत. या नेटिझनच्या प्रश्नावर सध्या तरी आलियाने काहीच उत्तर दिले नाही. 

Web Title: A person close to Alia cut her hair; Netizens said, "Isn't he Ranbir?"