‘राम गोपाल वर्माचे Twitter अकाऊंट कायमस्वरूपी बंद करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 10:01 IST2017-03-09T04:31:51+5:302017-03-09T10:01:51+5:30

सर्व महिला पुरूषांना तितकाच आनंद देतील, जितका सनी लिओनीने दिलाय, अशी अपेक्षा जागतिक महिला दिनी व्यक्त करणारे दिग्दर्शक राम ...

'Permanently close the Twitter account of Ram Gopal Varma' | ‘राम गोपाल वर्माचे Twitter अकाऊंट कायमस्वरूपी बंद करा’

‘राम गोपाल वर्माचे Twitter अकाऊंट कायमस्वरूपी बंद करा’

्व महिला पुरूषांना तितकाच आनंद देतील, जितका सनी लिओनीने दिलाय, अशी अपेक्षा जागतिक महिला दिनी व्यक्त करणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायम वादग्रस्त tweets करून वाद ओढवून घेणारे राम गोपाल वर्मा यांनी काल महिला दिनी एकापाठोपाठ एक असे अनेक आक्षेपार्ह tweets केले होते. त्यांच्या या tweetsवर सर्व स्तरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हिंदू ग्रूप हिंद जागृती या महिला शाखेच्या प्रतीक्षा कोरगावकर यांनी याप्रकरणी थेट राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गोवा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वर्मा यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महिला कायद्याअंतर्गत स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे महिलांचा अपमान करणा-या राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. राम गोपाल वर्मांचे tweet अकाउंट नेहमीसाठी बंद केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

ALSO READ : ​महिला दिनी हे काय बरळले राम गोपाल वर्मा?

 प्रत्येक महिलेने सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना आनंद द्यायला हवा, असे वादग्रस्त tweet रामूने केले होते. याशिवाय महिलांपेक्षा पुरुषच हा दिवस अधिक उत्साहाने साजरा करत असल्याचे सांगत महिला दिन हा पुरुष दिन म्हणून साजरा करायला हवा, असेदेखील त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या tweetsवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. यावर राम गोपाल यांनी प्रत्युत्तरही दिले होती. सनी लिओनीवरील माझ्या tweetsवर अनेक ढोंगी लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे. इतर कोणत्याही महिलेपेक्षा सनी लिओनीत अधिक प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान आहे, असे वर्मा म्हणाले होते. सनीवर मी लवकरच लघुपट काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती.

Web Title: 'Permanently close the Twitter account of Ram Gopal Varma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.