‘परफेक्ट बिकनी लूक’साठी कॅटने घटवले ७ किलो वजन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 19:43 IST2016-08-16T14:05:00+5:302016-08-16T19:43:03+5:30
कॅटरिना कैफ सध्या बी-टाऊनपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. ‘बार बार देखो’मधील ‘सौ आसमान’ या गाण्यातील कॅटचा बिकनी लूक ...

‘परफेक्ट बिकनी लूक’साठी कॅटने घटवले ७ किलो वजन!!
क टरिना कैफ सध्या बी-टाऊनपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. ‘बार बार देखो’मधील ‘सौ आसमान’ या गाण्यातील कॅटचा बिकनी लूक पाहून तर तिचे चाहते थक्क झाले आहेत. पण कॅटरिनाने इतका परफेक्ट बिकनी लूक काही सहजपणे मिळवलेला नाही तर त्यामागे तिची प्रचंड मेहनत आहे. होय, हा परफेक्ट बिकनी लूक मिळवण्यासाठी कॅटने तब्बल ७ किलो वजन कमी केले. योगाचे अनेक सेशन आणि अनेक तासांचे वर्कआऊट करून तिने हा परफेक्ट लूक मिळवला. याचे काही व्हिडिओ कॅटने स्वत:च सोशल मीडियावर शेअर केले होते. कॅटरिनाने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत केली. कदाचित यापूर्वी कुठल्याही चित्रपटासाठी तिने इतका घाम गाळलेला नाही. त्याचाच परिपाक म्हणजे, आजही कॅटरिना हॉट लीड लेडी रोलसाठी परफेक्ट मॅच आहे. नित्या मेहरा दिग्दर्शित ‘बार बार देखो’ येत्या ९ सप्टेंंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. यात कॅटरिना व सिद्धार्थ मल्होत्रा या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहायला मिळणार आहे.
![]()