बापरे बाप, फरदीन खानचा नवीन लूक पाहिला का ? चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 18:13 IST2021-10-16T18:05:36+5:302021-10-16T18:13:39+5:30
Fardeen Khan गेल्या दहा वर्षांमध्ये एकाही सिनेमात दिसला नव्हता.त्यामुळे फरदीनची जादूही कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

बापरे बाप, फरदीन खानचा नवीन लूक पाहिला का ? चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा झटका
चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता फरदीन खान पुन्हा एकदा त्याच्या लूकमुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याचा लूक पाहूनच चाहते मात्र चांगलेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. फरदीन पुन्हा एकदा फॅट टू फिट झाला आहे. स्वतःमध्ये झालेला बदल पाहून कोणीही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही.
काही वर्षापूर्वीच फरदीन खानचा एक फोटो समोर आला होता. त्याचे अवाढव्य वाढलेले शरिर पाहून कोणीच त्याला ओळखलेही नव्हते. त्यावेळी त्याची फार चर्चा झाली होती. गेल्या दहा वर्षांमध्ये फरदीन एकाही सिनेमात दिसला नव्हता.त्यामुळे फरदीनची जादूही कमी झाल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांच्याही तो विस्मृतीत गेला होता.अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे फरदीनचं करिअर संपल्याचे बोलले गेले. फरदीनला काही काळासाठी रिहॅब सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते.
मात्र नुकतेच फरदीन टी-सीरिजच्या ऑफिसच्या बाहेर दिसला. यावेळी फरदीनने पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. फरदीनने काळा गॉगलही घातला होता. त्याचा डॅशिंग लूक मीडियाच्या कॅमे-यात कैद झाला. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की फरदीन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करू शकतो.
'ब्लास्ट' असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे, ज्याचे दिग्दर्शन संजय गुप्ता करत आहेत.फरदीन खान व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि प्रिया बापट देखील ब्लास्ट सिनेमात झळकणार आहेत. वेनेजुएलाची फिल्म रॉक पेपर सिजर्स (2012) मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमाचा हिंदी रीमेक असणार आहे. रॉक पेपर सिजर्स ला 85 व्या ऑस्कर अवॉर्ड्समध्येबेस्ड फॉरेन लॅग्वेजसाठी पुरस्कार मिळाला आहे.
फरदीन कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचला होता.फरदीनचा लूक पाहून एका युजरने कमेंट केली की, आता तू पूर्वीपेक्षाही जास्त हँडसम दिसतोय,त्याचवेळी दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले - फरदीनने अप्रतिम लूक मिळवला आहे. आताचा लूक पाहून कोणीच म्हणणार नाही की, 5 वर्षांपूर्वी एकदम गुटगुटीत तो झाला होता.