'मैंने प्यार किया' फेम गायिका शारदा सिन्हा अडकल्या पटनातील पूरात, तब्बल १८ तासानंतर केलं रेस्क्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:13 PM2019-10-01T13:13:52+5:302019-10-01T13:14:38+5:30

'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या गायिका शारदा सिन्हा पटनामध्ये आलेल्या पुरामध्ये अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता.

Patna floods: 'Maine Pyar Kiya' singer Sharda Sinha rescued by NDRF after 18 hours | 'मैंने प्यार किया' फेम गायिका शारदा सिन्हा अडकल्या पटनातील पूरात, तब्बल १८ तासानंतर केलं रेस्क्यू

'मैंने प्यार किया' फेम गायिका शारदा सिन्हा अडकल्या पटनातील पूरात, तब्बल १८ तासानंतर केलं रेस्क्यू

googlenewsNext

पटनामधील मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं आहे. या पुरामुळे पटनातील कित्येक लोक अडकले आहे. या अडकलेल्या व्यक्तींमध्ये 'मैंने प्यार किया'च्या गायिका शारदा सिन्हा यांचाही समावेश आहे. शारदा सिन्हा पूर परिस्थितीमुळे राजेंद्र नगरमधील त्यांच्या घरात अडकल्या होत्या. 


पूरामुळे घरात अडकलेल्या शारदा सिन्हा यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला आणि सरकारकडे बचावासाठी मदत मागितली होती. त्यांनी फेसबुकवर लिहिलं होतं की, मी माझ्या घरात अडकले आहे आणि घराच्या बाहेर निघता येत नाही. यासोबतच पद्मश्री पुरस्कार प्राप्त शारदा सिन्हा यांनी एअरलिफ्ट सुविधेची मागणी केली होती.


शारदा सिन्हा यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर काही कालावधीतच एनडीआरएफची टीम त्यांना आणि त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पटनातील राजेंद्र नगर परिसरात गेले होते. 
रेस्क्यू केल्यानंतर एका वाहिनीशी बोलताना शारदा सिन्हा यांनी सांगितलं की, खूप वाईट अवस्था आहे. मी माझ्या जीवनात असं यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. फक्त पाहिलं होतं की गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं १९९७ साली आणि त्यापूर्वी १९७५ मध्ये. माझ्या घराच्या तळमजल्यावर माझ्या छातीच्या वरपर्यंत पाणी भरलं आहे. मी इतकी घाबरली होती की मला वाटलं की मी आता बुडून जाईन. आम्ही आमच्या घरातील पहिल्या माळ्यावर होतो.

शारदा सिन्हा यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यांनी सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' चित्रपटासाठीदेखील गाणं गायलं होतं.
 

Web Title: Patna floods: 'Maine Pyar Kiya' singer Sharda Sinha rescued by NDRF after 18 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.