​दिशा पटनी पुन्हा चर्चेत! कारण काय तर हॉट फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 06:26 AM2017-06-30T06:26:00+5:302017-06-30T11:56:00+5:30

सध्या दिशा पटनी हिच्या हाताला फार काम नाही. नाही म्हणायला ती ‘बागी2’मध्ये दिसणार, अशी चर्चा आहे. पण नुसती चर्चाच. ...

Patna again discusses Hot Hot Photoshoot !! | ​दिशा पटनी पुन्हा चर्चेत! कारण काय तर हॉट फोटोशूट!!

​दिशा पटनी पुन्हा चर्चेत! कारण काय तर हॉट फोटोशूट!!

googlenewsNext
्या दिशा पटनी हिच्या हाताला फार काम नाही. नाही म्हणायला ती ‘बागी2’मध्ये दिसणार, अशी चर्चा आहे. पण नुसती चर्चाच.  अर्थात चर्चाच तर महत्त्वाची आहे. बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे तर तुम्ही सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहायलाच हवे आणि चर्चेत राहायचे कसे, हे दिशाला अगदी परफेक्ट जमते.  सध्या दिशा पुन्हा चर्चेत आली आहे. आपल्या कुठल्या चित्रपटामुळे वा टायगर श्रॉफसोबतच्या(दिशाचा कथित बॉयफ्रेन्ड) डिनर डेटमुळे नाही तर एका हॉट फोटोशूटमुळे. होय, एका लाईफस्टाईल व फॅशन मॅगझिनसाठी  दिशाने हॉट फोटोशूट केलेयं.





विजेन्द्र भारद्वाल आणि तनया वोहरा यांनी डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये दिशा या फोटोत प्रचंड कॉन्फिडंट दिसते आहे. दिशाचे चाहते तिचे हे बोल्ड रूप पाहून नक्कीच सुखावतील,असेच हे फोटो आहेत. सोनेरी, पांढºया, निळ्या, काळ्या अशा सगळ्या रंगातील ड्रेसमध्ये दिशाचे सौंदर्य खुलून आले आहे. 



ALSO READ : दिशा पटनी करतेय टायगर श्रॉफची हेरगिरी?

‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यानंतर   इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये दिशाची वर्णी लागली. लवकरच दिशा ‘बागी2’मध्ये दिसणार अशी चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. ही घोषणा झाली की, आम्ही तुम्हाला कळवूच. तोपर्यंत या ताज्या फोटोशूटमधील बोल्ड दिशा तुम्ही बघाच आणि केवळ बघू नका तर ते कसे वाटले, तेही आम्हाला सांगा.
 

Web Title: Patna again discusses Hot Hot Photoshoot !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.