Patch up !!! ​सुशांत सिंह राजपूत अन् क्रिती सॅनन रोमॅन्टिक ड्राईव्हवर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 18:18 IST2017-04-11T12:48:11+5:302017-04-11T18:18:11+5:30

सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांच्या ब्रेकअपची बातमी मध्यंतरी गाजली. पण कदाचित बॉलिवूडमध्ये ब्रेकअप अन् पॅचअप व्हायला ...

Patch up !!! Sushant Singh Rajput and Kryti Sanan romantic drive ...! | Patch up !!! ​सुशांत सिंह राजपूत अन् क्रिती सॅनन रोमॅन्टिक ड्राईव्हवर...!

Patch up !!! ​सुशांत सिंह राजपूत अन् क्रिती सॅनन रोमॅन्टिक ड्राईव्हवर...!

शांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांच्या ब्रेकअपची बातमी मध्यंतरी गाजली. पण कदाचित बॉलिवूडमध्ये ब्रेकअप अन् पॅचअप व्हायला वेळ लागत नाही. सुशांत आणि क्रिती यांच्याबाबतही हेच. होय, तुम्हाला ऐकून खरे वाटणार नाही. पण ब्रेकअपची चर्चा सुरु असताना नुकतेच हे दोघे  भरदुपारी मस्तपैकी रोमॅन्टि ड्राईव्ह एन्जॉय करताना दिसले. तेही सुशांतच्या नव्या को-या गाडीत.





खरे तर क्रिती आणि सुशांत दोघांनीही ते रिलेशनशिपमध्ये आहेत, याचा कायम इन्कारच केला. आम्ही चांगले मित्र आहोत, एवढेच ते सांगत होते. पण गेल्या वर्षभरापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. ‘राबता’च्या सेटवर दोघांची भेट झाली आणि तेथून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण अलीकडे सुशांतचे मूड स्विंग्स आणि त्याचा स्वभाव यामुळे क्रिती या रिलेशनशिपबद्दल कन्फ्युज असल्याची बातमी आली. एवढेच नाही तर हे रिलेशनशिप पुढे नेण्यात अर्थ नाही, असे कळून चुकल्याने सुशांत व क्रिती दोघांनीही त्यावर फुली मारण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हटले गेले. पण कदाचित असे नाहीय. सुशांत क्रितीची समजूत काढण्यात यशस्वी झाला, असे वाटतेय. क्रिती व सुशांतच्या रोमॅन्टिक ड्राईव्हचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे कळून चुकेल.





सुशांतने अलीकडे मैसेराटी क्वाट्रोपोर्टे ही लग्झरी कार खरेदी केली आहे. ही कार म्हणजे सुशांतच्या स्वप्नातील कार. ही कार घरी येताच सुशांतने सर्वप्रथम यातून कुणाला सैर करवली असेल तर ती क्रिती आहे. आहे ना मजेशीर...!

ALSO READ : सुशांत सिंह राजपूतच्या ‘रोमियो अकबर वॉल्टर’चे फर्स्ट लूक पाहाच!!

 गतवर्षी सुशांतचे अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाले होते. याचकाळात सुशांत क्रितीच्या जवळ आला. यानंतर दोघेही अनेकदा अनेक इव्हेंटला एकत्र दिसले. 

Web Title: Patch up !!! Sushant Singh Rajput and Kryti Sanan romantic drive ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.