परिणीती सलमानसोबत काम करण्यास उतावीळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:01 IST2016-07-05T13:31:45+5:302016-07-05T19:01:45+5:30
परिणीती चोपडा सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’मध्ये बिझी आहे. परिणीतीच्या फिल्मी करिअरला धमाकेदार सुरुवात झाली. पण ‘लेडिस वर्सेज रिकी बहल’,‘इश्कजादे’,‘शुद्ध ...
.jpg)
परिणीती सलमानसोबत काम करण्यास उतावीळ !
प िणीती चोपडा सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’मध्ये बिझी आहे. परिणीतीच्या फिल्मी करिअरला धमाकेदार सुरुवात झाली. पण ‘लेडिस वर्सेज रिकी बहल’,‘इश्कजादे’,‘शुद्ध देसी रोमांस’, ‘दावत-ए-इश्क’सारखे परीचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. अशात परिणीतीला आपल्या करिअरची चिंता भेडसावणे साहजिकच आहे. त्यामुळेच काहीतरी धमाकेदार व्हावे, असे परीला वाटते आहे. यासाठी एखाद्या मोठ्या स्टारसोबत चित्रपट करावा, यासाठी म्हणे परीने प्रयत्न चालवले आहेत. विशेषत: सलमान खानसोबत तिला चित्रपट करायचा आहे. सलमानने अनेक अभिनेत्रींचे फिल्मी करिअर सावरले आहे. त्यामुळेच परिणीतीलाही सलमानकडून आशा आहे. यासाठी सलमानची ऐनकेन प्रकारे भेट व्हावी, यासाठी परिणीतीचा आटापीटा सुरु आहे. यासाठी एका गुप्त सूत्रालाही तिने कामी लावल्याची खबर आहे. अर्थात इतक्या प्रयत्नांनंतरही परीला यश आलेले नाही. कारण सलमान सध्या प्रचंड बिझी आहे. परिणीती सलमानसोबत काम करण्यास आतूर आहे, हे परीच्या प्रवक्त्याने मान्य केले आहे. मात्र यासाठी तिने एका गुप्त सूत्राला कामी लावले, हे मात्र प्रवक्त्याने नाकारले आहे. आता बघूयात, परिणीती सलमानच्या मनधरणीसाठी काय काय करते ते??