परिणीती -अर्जून पुन्हा साथ-साथ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 20:03 IST2016-06-22T14:33:08+5:302016-06-22T20:03:08+5:30
कदाचित परिणीती चोपडाने तिचे फिल्मी करिअर चांगलेच गंभीरपणे घेतले आहे. एकापाठोपाठ एक असे चित्रपट साईन करण्याचा जणू तिने सपाटा ...

परिणीती -अर्जून पुन्हा साथ-साथ!!
क ाचित परिणीती चोपडाने तिचे फिल्मी करिअर चांगलेच गंभीरपणे घेतले आहे. एकापाठोपाठ एक असे चित्रपट साईन करण्याचा जणू तिने सपाटा लावलाय. वाढलेले वजन कमी केल्यानंतर परिणीती आता करिअरला वेग देण्याच्या इराद्यात आहे. अलीकडे परिणीतीने एआर. मुरूगदास यांचा तेलगू चित्रपट साईन केल्याची खबर आली. यात परिणीती तेलगू स्टार महेशबाबू यांच्या अपोझिट काम करणार आहे. एका नव्या बातमीनुसार, परिणीतीने आणखी एक चित्रपट साईन करण्याची तयारी चालवली आहे. होय, अनिस बज्मीचा चित्रपट परी साईन करण्याची शक्यता आहे . यात परिणीतीच्या अपोझिट कोण आहे माहितीय..अर्जून कपूर.. परिणीतीने स्क्रिप्ट ऐकली आणि तिला ती आवडली..आता केवळ साईन करण्याची ‘देर’ आहे.!!