परिणीती चोप्राची ‘फेवरेट माँ’ चारू रोहतगी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 14:34 IST2018-01-15T09:04:22+5:302018-01-15T14:34:22+5:30
‘नो वन किल्ड जेसिका’ आणि ‘इशकजादे’ यासारख्या चित्रपटांतील शानदार अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री चारू रोहतगी यांचे आज सोमवारी सकाळी ...

परिणीती चोप्राची ‘फेवरेट माँ’ चारू रोहतगी यांचे निधन
‘ ो वन किल्ड जेसिका’ आणि ‘इशकजादे’ यासारख्या चित्रपटांतील शानदार अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री चारू रोहतगी यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. चारू यांची प्रकृती गत काही दिवसांपासून बरी नव्हती. आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्या ४८ वर्षांच्या होत्या.
![]()
दरम्यान चारू यांच्या अतिशय जवळ असलेल्या एका स्पॉटबॉयने चारू यांचा मृत्यूमागे वाढता तणाव हे कारण असल्याचे म्हटले आहे. चारू अलीकडे पहाटे ३ वाजेपर्यंत शूटींग करत होत्या, असे या स्पॉटबॉयने सांगितले. आज दुपारी चारू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चारू सब टीव्हीवरील ‘त्रि देवियां’ या मालिकेत काम करत होत्या. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘प्रतिज्ञा’ आणि ‘उतरण’ या मालिकेतील त्यांची भूमिकाही लोकप्रीय ठरली होती.
‘इशकजादे’ या चित्रपटात चारू यांनी परिणीती चोप्रा हिच्या ‘फेवरेट माँ’ची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनावर परिणीतीने दु:ख व्यक्त केले आहे. ‘इशकजादे’मधील तुम्ही सगळ्यांत प्रेमळ आई होतात. तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शानदार होता. तुम्हाला विसरणे शक्य नाही. ईश्वर तुमच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याची शक्ती देवो, अशा भावना परिणीतीने व्यक्त केल्या आहेत.