भावाच्या लग्नाला जाणार नाही परिणीती चोप्रा? शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणते- "ज्या लोकांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:25 IST2025-02-06T14:24:49+5:302025-02-06T14:25:21+5:30

परिणीतीचे आईवडीलही सिद्धार्थच्या लग्नात एन्जॉय करताना दिसले. मात्र, परिणीती कुठेच दिसली नाही. त्यामुळेच परिणीती भावाच्या लग्नाला का गेली नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

parineeti chopra will not attend brother wedding shared criptic insta post | भावाच्या लग्नाला जाणार नाही परिणीती चोप्रा? शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणते- "ज्या लोकांनी..."

भावाच्या लग्नाला जाणार नाही परिणीती चोप्रा? शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणते- "ज्या लोकांनी..."

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई सुरू आहे. प्रियांकाचा चुलत भाऊ सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकतंच त्याचा हळदी समारंभ पार पडला. भावाच्या हळदीत प्रियांकानेही ठुमके लगावले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र या सगळ्यात परिणीती चोप्रा कुठेच दिसली नाही. आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

परिणीतीचे आईवडीलही सिद्धार्थच्या लग्नात एन्जॉय करताना दिसले. मात्र, परिणीती कुठेच दिसली नाही. त्यामुळेच परिणीती भावाच्या लग्नाला का गेली नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दरम्यानच तिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. "आपण उधारीच्या वेळेवर जगत आहोत. अशा लोकांना निवडा ज्यांनी तुम्हाला निवडले", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

दरम्यान, सध्या परिणीती तिच्या आगामी प्रोजेक्टच्या कामात व्यग्र आहे. त्यामुळेच ती भावाच्या लग्नात सहभागी होऊ शकणार नाहीये. सिद्धार्थच्या साखरपुड्यातही परिणीती दिसली नव्हती. प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ साऊथ अभिनेत्री नीलम उपाध्यायशी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला होता. 

Web Title: parineeti chopra will not attend brother wedding shared criptic insta post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.