"कोणीतरी थांबवा प्लीज", परिणीती चोप्राच्या कॉन्सर्टमधील व्हिडिओ पाहून संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:23 PM2024-02-02T16:23:55+5:302024-02-02T16:29:51+5:30

लाइव्ह कॉन्सर्टमुळे ट्रोल झाली परिणीती चोप्रा, नेटकऱ्यांनी दिला न गाण्याचा सल्ला

parineeti chopra troll for singing badly in live concert netizens troll her said dont sing again | "कोणीतरी थांबवा प्लीज", परिणीती चोप्राच्या कॉन्सर्टमधील व्हिडिओ पाहून संतापले नेटकरी

"कोणीतरी थांबवा प्लीज", परिणीती चोप्राच्या कॉन्सर्टमधील व्हिडिओ पाहून संतापले नेटकरी

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चर्चेत आली आहे. परिणीतीने अभिनयानंतर आता संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच परिणीतीने गाणं गाण्याचा सराव करतानाचा फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. त्यानंतर तिने मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टही केलं होतं. या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ परिणीतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. पण, परिणीतीचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

परिणीतीने तिच्या सोशल मीडियावरुन लाइव्ह कॉन्सर्टचे काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिने कॉन्सर्टमधील एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत ती "आज जाने की जिद ना करो" हे गाणं गाताना दिसत आहे. पण, परिणीतीने गायलेलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलेलं नाही. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत तिला पुन्हा न गाण्याचा सल्ला दिला आहे. एकाने कमेंट करत "आज गाने की जिद ना करो" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "नको गाऊस" असं म्हटलं आहे. "तू चांगलं गातेस असं कोणी सांगितलं हिला?" अशी कमेंटही केली आहे. 

एका ट्वीटर अकाऊंटवरुनही परिणीतीच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ती "मैं परेशान" हे गाणं गात आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी तिची तुलना रानू मंडलशी केली आहे. 

दरम्यान, परिणीतीने २४ सप्टेंबर २०२३ रोजी आप खासदार राघव चड्ढा यांच्याशी विवाह करत संसार थाटला. परिणीतीच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी राघव चड्ढाही उपस्थित होते. त्यांनी परिणीतीसाठी खास पोस्टही शेअर केली होती. 
 

Web Title: parineeti chopra troll for singing badly in live concert netizens troll her said dont sing again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.