परिणिती चोप्राला या कारणामुळे सहन करावा लागला फॅन्सचा रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 10:22 IST2017-01-11T21:19:20+5:302017-01-12T10:22:35+5:30

सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह राहणाºया अभिनेत्री परिणिती चोप्राला तिने शेअर केलेली एक पोस्ट चांगलीच भोवली. सध्या परिणिती कामाच्या संदर्भात दुबईत असून, गेल्या मंगळवारी तिने येथील बीचवर फिरतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओमध्ये ती काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करून अनवानी पायाने चालत असताना दिसत होती.

Parineeti Chopra suffered from the fury of Fan because of this reason | परिणिती चोप्राला या कारणामुळे सहन करावा लागला फॅन्सचा रोष

परिणिती चोप्राला या कारणामुळे सहन करावा लागला फॅन्सचा रोष

शल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह राहणाºया अभिनेत्री परिणिती चोप्राला तिने शेअर केलेली एक पोस्ट चांगलीच भोवली. सध्या परिणिती कामाच्या संदर्भात दुबईत असून, गेल्या मंगळवारी तिने येथील बीचवर फिरतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओमध्ये ती काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करून अनवानी पायाने चालत असताना दिसत होती. इथपर्यंत सर्व काही ठीक होते, मात्र जेव्हा व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तीन बॅग खांद्यावर लटकून तिच्या डोक्यावर छत्री पकडून तिच्या मागे-मागे चालत होता, तेव्हा फॅन्सचा जबरदस्त संताप झाला. फॅन्सनी परिणितीला असे काही सुनावले की, तिला दुसºया मिनिटाला ही पोस्ट डिलिट करावी लागली. 



परिणितीने शेअर केलेल्या या व्हिडीओला बघता-बघता पाचशेपेक्षा अधिक कमेण्टस आल्या, ज्यामध्ये फॅन्सना जाणून घ्यायचे होते की, परिणिती स्वत: छत्री का पकडू शकत नाही? तर काही फॅन्सनी तिला प्रतिप्रश्न करीत, तू हा व्हिडीओ शेअर करून काय शो-आॅफ करू इच्छिते? तू स्वत: छत्री पकडली तर तुझे स्टारडम कमी होणार काय? काहींचा राग तर असा काही होता, ज्यामुळे परिणितीही आवाक् झाली असेल. एका फॅन्सची कमेण्ट्स अशी होती की, ऐकीकडे तू उन्हात वेगवेगळ्या पोज देत उभी आहेस अन् दुसरीकडे उन्हापासून बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीला स्वत:मागे पळवीत आहेत. हे जास्तच ‘बिहाइंड द सीन’सारखे वाटते. कृपया जरा रिअ‍ॅलिस्टि रहा’

फॅन्सच्या या प्रतिक्रिया वाढू लागल्याचे परिणितीच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने ही पोस्ट डिलिट केली. मात्र परिणितीबाबत असा प्रसंग पहिल्यांदाच घडला असे अजिबात नाही. यापूर्वीदेखील तिच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप लावला गेला आहे. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात परिणितीने तिच्या एका मित्राला बर्थ डे विश करताना ट्विटरवर ‘कमी खा आणि बारीक हो’ असे लिहिले होते. ज्यामुळे तिच्यावर नेटिझन्सनी टीकेची झोड उठविली होती. 

परिणितीने २०११ मध्ये ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर इशकजादे, हसी तो फसी, दावत-ए-इश्क, शुद्ध देसी रोमांस आणि किल दिल यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. सध्या ती आयुष्यमान खुराना याच्यासोबत ‘मेरी प्यारी बिंदू’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा येत्या मे महिन्यात रिलिज होणार आहे. 

">http://

 

Web Title: Parineeti Chopra suffered from the fury of Fan because of this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.