गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...

By कोमल खांबे | Updated: August 25, 2025 12:37 IST2025-08-25T12:36:49+5:302025-08-25T12:37:11+5:30

Parineeti Chopra Pregnancy News: लग्नानंतर दोन वर्षांनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या घरी पाळणार हलणार आहे. परिणीती आणि राघव चड्ढा लवकरच आईबाबा होणार आहेत. 

parineeti chopra announces pregnancy after 2 years of marriage soon to become mother of raghav chaddha child | गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...

गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...

कियारा अडवाणी, अथिया शेट्टी, मालविका राज यांच्यानंतर बॉलिवूडमधून अजून एक गुडन्यूज आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत परिणीतीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या घरी पाळणार हलणार आहे. परिणीती आणि राघव चड्ढा लवकरच आईबाबा होणार आहेत. 

परिणीतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चिमुकल्याच्या पायांचे ठसे दिसत आहेत. "१+१ = ३" असं त्या फोटोमध्ये दिसत आहे. "आमचं छोटं युनिव्हर्स लवकरच येत आहे", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. परिणीतीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसंच त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. 


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर दोन वर्षांनी आईबाबा होणार असल्याने ते दोघेही आनंदी आहेत. राघव चड्ढा हे राजकारणात सक्रीय असून आम आदमी पक्षाचे ते खासदार आहेत. 
 

Web Title: parineeti chopra announces pregnancy after 2 years of marriage soon to become mother of raghav chaddha child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.