परिणीती चोप्रा अन् हार्दिक पंड्याची ‘लिंक’ झाली व्हायरल; लोकांनी दिला असा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:59 IST2017-09-04T08:26:41+5:302017-09-04T13:59:00+5:30
आपल्या स्टाईलिश लूकसाठी प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू म्हणजे, हार्दिक पंड्या. हार्दिक या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. केवळ क्रिकेटच्या ...

परिणीती चोप्रा अन् हार्दिक पंड्याची ‘लिंक’ झाली व्हायरल; लोकांनी दिला असा सल्ला!
आ ल्या स्टाईलिश लूकसाठी प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू म्हणजे, हार्दिक पंड्या. हार्दिक या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. केवळ क्रिकेटच्या पिचवरच नाही तर सोशल मीडियावरही तो तुफान बॅटींग करतो. सध्या हार्दिक याच कारणामुळे चर्चेत आहे. twitterवर हार्दिकने असे काही ‘सवाल-जवाब’ केलेत की, तो भलताच चर्चेत आला. केवळ चर्चेतच नाही तर लोकांंनी थेट हार्दिकला बरेच सल्लेही दिलेत. चला, आता हा सगळा मामला काय, ते समजून घेऊ.
परिणीत चोप्राच्या एका tweetपासून याची सुरुवात झाली. परिणीतीने अलीकडे स्वत:च्या टिष्ट्वटर अकाऊंट एक फोटो tweet केला. ‘परफेक्ट पार्टनरसोबत एक परफेक्ट ट्रिप, लव्ह इन दी एअर’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले. परिणीतीने हे tweet करायची देर की, हार्दिकने त्यावर लगेच उत्तर दिले. ‘मी गेस करू शकतो का? मला वाटतेय ही बॉलिवूड व क्रिकेट यांच्यातील नवी लिंक आहे,’ असे परिणीतीने पोस्ट केलेला तो फोटो पाहून त्याने लिहिले.
![]()
ALSO READ : सुश्मिता सेनने ‘या’ क्रिकेटपटूला म्हटले, ‘आय लव्ह यू’!
परिणीतीनेही हार्दिकच्या या कमेंटला रिप्लाय केला. ‘कदाचित असूही शकते किंवा नाही सुद्धा. मी केवळ इतके म्हणेल की, पुरावा याच फोटोत आहे,’असे तिने लिहिले. परिणीती व हार्दिकचा हा ‘tweet-tweet’ खेळ असा चांगलाच रंगला.
पण परिणीती व हार्दिक असे ‘tweet-tweet’ खेळत असलेले पाहून लोकांना मात्र राहावले नाहीच. मग काय, काहींनी या दोघांची चांगलीच खिल्ली उडवणे सुरु केले. काही युजर्सनी हार्दिकला आपल्या खेळावर लक्ष देण्याचा सल्ला दिला तर काहींनी ‘इशारों-इशारों’मध्ये चाललेल्या या खेळाला ‘क्यूट’ म्हटले. ‘पोरगा, हिरोईनवर लट्टू झालाय. खेळावर लक्ष दे भावा,’ असे एका युजरने लिहिले. तर‘भावा, माझा सपोर्ट सगळ्यावर वर आहे. पण खेळावर फोकस नसेल तर सपोर्टचा काहीच अर्थ नाही,’असे दुसºया युजरने लिहिले.