परेश रावल यांची पत्नी आहे मिस इंडिया, बॉलिवूडमध्ये केलंय काम, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 05:21 PM2019-10-28T17:21:24+5:302019-10-28T17:22:17+5:30

परेश रावल यांच्या पत्नी स्वरूप संपत यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

Paresh Rawal's wife is Miss India, work done in Bollywood, See Photos | परेश रावल यांची पत्नी आहे मिस इंडिया, बॉलिवूडमध्ये केलंय काम, See Photos

परेश रावल यांची पत्नी आहे मिस इंडिया, बॉलिवूडमध्ये केलंय काम, See Photos

googlenewsNext

परेश रावल म्हटलं की डोळ्यासमोर चेहरा येतो तो हेराफेरी चित्रपटात जाड भिंगाचा चेहरा डोळ्यांसमोर येतो.  २०० पेक्षा अधिक चित्रपट आणि विनोदी ते खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे परेश यांना खरी ओळख मिळाली ती विनोदी भूमिकांमुळे. अक्षय कुमार व त्यांची जोडी कमालीची गाजली. या जोडीने जवळपास २३ सिनेमे एकत्र केलेत. त्यांनी फक्त विनोदीच भूमिका नाही तर निगेटिव्ह भूमिकादेखील उत्तमरित्या साकारल्या आहेत. परेश रावल यांच्या पत्नी स्वरूप संपत यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

परेश रावल यांच्या पत्नी स्वरूप संपत एक अभिनेत्री आहेत. त्यांनी १९७९ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि मिस इंडियाचा किताब त्यांनी पटकावला आहे. त्याच वर्षी त्यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी ‘नरम गरम’ (१९८१), ‘हिम्मतवाला’ (१९८३), ‘करिष्मा’ (१९८४), ‘साथिया'(२००२), ‘सप्तपदी’ (२०१३) यासारख्या चित्रपटांत काम केले आहे. १९८४ मध्ये आलेल्या ‘करिष्मा’ चित्रपटांत त्यांनी बिकनी घालून सर्वांना थक्क केले होते.

त्यांनी ‘कि अँड का’ (२०१६) चित्रपटांत करीना कपूरच्या आईची भूमिका निभावली होती. कॉमेडी टीव्ही शो ‘ये जो है जिंदगी’ साठी त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करण्यास नकार दिला होता. परंतु त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. कारण ‘ये जो है जिंदगी’ हा टीव्ही शो खूपच लोकप्रिय झाला होता.


एका मुलाखतीत स्वरूप संपत यांनी सांगितले की, ज्यावेळी मी मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती, तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता. कारण मी अनेक वर्ष गावात एका झोपडीत राहिली आहे. इतकंच नाही जेव्हा मी चित्रपटांत काम करायची तेव्हा आरसा सुद्धा पाहत नसे. चित्रपटांत काय घालणार आहे, माझा लूक कसा असणार याबद्दल मी कधीच चर्चा करत नव्हती.


बॉलिवूड सोडण्याबाबत त्यांनी सांगितले की, ८०च्या दशकानंतर चांगले चित्रपट बनणं बंद झाले होते. मला सुजाता आणि अनुराधासारख्या चित्रपटांत काम करायचे होते. परंतु नंतर त्याप्रकारचे चित्रपट बनले नाहीत.


हिम्मतवाला चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुमकुम बनवणाऱ्या शृंगार कंपनीसाठी मॉडेलिंगसुद्धा केली आहे. त्या आता दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात. आत्ताचे पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वरूप संपत ह्यांना मुलांसाठी असणाऱ्या एज्युकेशन विभागासाठी हेड म्हणून नियुक्त केले होते.

शिक्षिका आणि समाजसेवा व्यतिरिक्त त्या एक चांगल्या लेखिका सुद्धा आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. 

 

Web Title: Paresh Rawal's wife is Miss India, work done in Bollywood, See Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.