'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 07:18 PM2023-12-03T19:18:16+5:302023-12-03T19:33:13+5:30

राजकीय भूमिका घेणं किंवा मत मांडणं यामुळे परेश रावल हे कायम चर्चेत असतात.

Paresh Rawal on nepotism in Bollywood | 'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल

'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल

परेश रावल हे बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परेश स्वतःचं मत कायम निर्भीडपणे मांडत असतात. राजकीय भूमिका घेणं किंवा मत मांडणं यामुळे परेश रावल हे कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे. 

 परेश रावल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “माझी मुलं स्वतः निवड करतात. चुका केल्याशिवाय ते शिकणार नाहीत. त्यांनी येऊन मला याबाबत विचारले तर मी त्यांना सल्ला देईन. त्यांनी मला विचारले नाही तर मी त्यांना काहीही सांगणार नाही. त्यांना स्वतःचा मार्ग शोधू द्या. मला माहित आहे की ते खूप मेहनती आहेत. बॉलीवूडमध्ये त्यांनी माझ्या नावाचा वापर केला नाही'.

नेपोटिझम मुद्द्यावर आपले मत मांडताना परेश रावल म्हणाले, “मला वाटतं की नेपोटिझम मुद्दा बेकार आहे. जर माझा मुलगा रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट इतका प्रतिभावान असता तर मी माझे सर्व पैसे त्याच्यावर गुंतवले असते. ही काही चुकीची गोष्ट नाही. डॉक्टरांचे मूल डॉक्टर झाले नाही तर न्हावी होईल का?, असा सवाल त्यांनी केला. 

बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही.  चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ते ओळखला जातात. ते प्रत्येक चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसतात आणि तो कोणत्याही भूमिकेशी पूर्णपणे जुळवून घेतात. परेश रावल 40 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहेत. सध्या ते त्याच्या आगामी 'वेलकम 3' आणि 'हेरा फेरी 3' या चित्रपटांची तयारी करत आहे. त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर कॉमेडी करताना पाहण्यासाठी चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

परेश रावल यांना अनिरुद्ध आणि आदित्य रावल अशी दोन मुले आहेत. दोघेही सध्या अभिनयाच्या दुनियेत सक्रिय आहेत. त्यांचा मुलगा आदित्य रावलने 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'बमफाड'मधून करिअरला सुरुवात केली. त्याचबरोबर 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सुलतान'मधून अनिरुद्ध रावलने बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'टायगर जिंदा है' आणि 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'स्कूप' सारख्या सिनेमांचा तो भाग होता.

Web Title: Paresh Rawal on nepotism in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.