लाडक्या मीशासोबत पार्कमध्ये खेळताना दिसला पप्पा शाहिद कपूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 19:51 IST2017-08-20T14:21:19+5:302017-08-20T19:51:31+5:30

​शाहिद कपूर सध्या परिवारासमवेत विदेशात सुुट्या एन्जॉय करीत आहे. कालच त्याने पत्नी मीरासोबत एक सेल्फी सोशल अकाउंटवर पोस्ट केली होती.

Pappa Shahid Kapoor seen playing in the park with a lovely Misha | लाडक्या मीशासोबत पार्कमध्ये खेळताना दिसला पप्पा शाहिद कपूर !

लाडक्या मीशासोबत पार्कमध्ये खेळताना दिसला पप्पा शाहिद कपूर !

हिद कपूर सध्या परिवारासमवेत विदेशात सुुट्या एन्जॉय करीत आहे. कालच त्याने पत्नी मीरासोबत एक सेल्फी सोशल अकाउंटवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये तो मीराच्या गालाला किस करताना दिसत आहे. आज त्याने लाडक्या मीशासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये शाहिद आणि त्याची लाडकी मीशा एका पार्कमध्ये बघावयास मिळत आहेत. शाहिद मीशापासून काही अंतरावर उभा असल्याचे दिसत आहे. तर मीशा चिमुकल्या पावलांनी पप्पा शाहिदकडे धाव घेताना दिसत आहे. 

शाहिद नेहमीच मुलगी मीशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. शाहिद काही दिवसांपासून आपल्या परिवारासमवेत मीशाचा पहिला बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी विदेशात आहे. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र मुलीच्या बर्थ डेसाठी त्याने शूटिंगमधून काही दिवस ब्रेक घेतला आहे. मीशाचा पहिलाच बर्थ डे असल्याने शाहिदला तो धुमधडाक्यात सेलिब्रेट करायचा आहे. 
 

शाहिदची पत्नी मीरा आणि शाहिद गेल्या काही दिवसांपासून बर्थ डेची जोरदार प्लॅनिंग करीत आहेत. मीशा या महिन्याच्या २६ तारखेला एक वर्षाची होणार आहे. अशात तिचे मम्मी-पप्पा तिचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यास कुठलीच कसर सोडू इच्छित नाहीत. काही दिवसांपूर्वीच मीरा राजपूतने म्हटले होते की, मीशाला मीडियापासून दूर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. कारण आम्हा दोघांना असे वाटते की, तिने तिचे बालपण एन्जॉय करावे. आम्ही लहानपणापासूनच तिला ही शिकवण देऊ इच्छितो की, तिला आज जे काही मिळाले ते केवळ तिच्या वडिलांमुळेच मिळाले.’

Web Title: Pappa Shahid Kapoor seen playing in the park with a lovely Misha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.