पापा सैफ अली खानने केला खुलासा, ‘हे पदार्थ आवडतात तैमूरला’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 15:07 IST2017-09-30T09:37:31+5:302017-09-30T15:07:31+5:30

सध्या स्टारकिड्सचा बोलबाला असून, त्यामध्ये सर्वांत आघाडीवर पतौडी परिवाराचा वारस तैमूर अली खान हा आहे. तैमूरचा जन्म झाल्यापासून ते ...

Papa Saif Ali Khan disclosed, 'This stuff loves Tamur'! | पापा सैफ अली खानने केला खुलासा, ‘हे पदार्थ आवडतात तैमूरला’!

पापा सैफ अली खानने केला खुलासा, ‘हे पदार्थ आवडतात तैमूरला’!

्या स्टारकिड्सचा बोलबाला असून, त्यामध्ये सर्वांत आघाडीवर पतौडी परिवाराचा वारस तैमूर अली खान हा आहे. तैमूरचा जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शिवाय तैमूरही कुठल्या ना कुठल्या कारणाने लाइमलाइटमध्ये राहत असल्याने त्याच्याविषयी जाणून घेण्यास चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. जेव्हा तैमूरचा एकही फोटो समोर आला नव्हता तेव्हा लोक त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असायचे. मात्र जेव्हा त्याचे फोटो समोर यायला सुरुवात झाली तेव्हा तैमूरविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची सैफ आणि करिनांच्या चाहत्यांमध्ये जणूकाही चढाओढ निर्माण झाली. 

असो आज आम्ही तैमूरविषयी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. अर्थात याचा खुलासा पापा सैफ अली खान यानेच केला आहे. सध्या सैफ त्याच्या आगामी ‘शेफ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासंबंधीच जेव्हा तो माध्यमांमध्ये मुलाखत देण्यासाठी गेला तेव्हा त्याला तैमूरच्या खानपानाविषयी विचारले. तैमूरची फेव्हरेट डिश कुठली? असे सैफला विचारण्यात आले. सैफने सांगितले की, ‘जर मी ही मुलाखत आटोपून त्याचा चेहरा बघितला नाही, तर तो फुड काय मलादेखील ओळखणार नाही. मी त्याला गेल्या तीन दिवसांपासून भेटलो नाही.’ 

यानंतर सैफने त्याच्या फेव्हरेट डिशविषयी सांगितले. सैफने म्हटले की, नाशपाती फळाचा लगदा आणि गाजर खूप आवडते. जेव्हा त्याने पहिल्यांदा फूड प्रॉडक्टची चव घेतली होती, तेव्हा तो खूपच अद्भुत असा अनुभव होता. आम्ही त्याला दाळ आणि बटाटा मिक्स करून दिले होते. या पदार्थांची चव घेताना त्याचा चेहरा स्पष्टपणे सांगत होता की, याची चव तेवढी वाइट नाही. त्याला पहिल्यांदा जेवण देताना आम्हाला खूप आनंद झाला. सैफचा ‘शेफ’ हा यावर्षातील त्याचा दुसरा चित्रपट आहे. यावर्षीच त्यांचा ‘रंगून’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता. त्यामुळे त्याला ‘शेफ’ या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. बºयाच काळानंतर सैफ परतत असल्याने या चित्रपटाचा स्वाद प्रेक्षकांना आवडेल अशी त्याला खात्री आहे. 

‘शेफ’ या चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास, मुलगा आणि वडिलांच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात सैफ अशा वडिलांची भूमिका साकारत आहे, जो त्याच्या मुलाला दर महिन्याला विदेशात पैसे तर पाठवतो, पण मुलासाठी त्याच्याकडे अजिबातच वेळ नसतो. दिग्दर्शक राजा कृष्ण मेनने सांगितले की, ‘शेफ हा चित्रपट केवळ आजच्या जनरेशनलाच नाही तर जुन्या जमान्यातील लोकांना विचार करायला भाग पाडेल. 

Web Title: Papa Saif Ali Khan disclosed, 'This stuff loves Tamur'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.