‘पापा, माझी प्रेरणा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 18:04 IST2016-08-22T12:34:50+5:302016-08-22T18:04:50+5:30

 सेलिब्रिटींना स्वत:च्या फिटनेसची काळजी ही घ्यावीच लागते. फिगर मेंटेन ठेवण्याच्या धडपडीत ते कधीकधी जास्त प्रमाणात व्यायाम करतात. ज्यामुळे नंतर ...

'Papa, my inspiration' | ‘पापा, माझी प्रेरणा’

‘पापा, माझी प्रेरणा’

 
ेलिब्रिटींना स्वत:च्या फिटनेसची काळजी ही घ्यावीच लागते. फिगर मेंटेन ठेवण्याच्या धडपडीत ते कधीकधी जास्त प्रमाणात व्यायाम करतात. ज्यामुळे नंतर त्यांनाच त्रास होतो. पण होणाऱ्या त्रासामुळे कधीही ते स्वत:ला मेंटेन ठेवायचे विसरत नाहीत.

‘बी टाऊन’ च्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर. ती तिच्या फिटनेसबद्दल बोलतांना म्हणते,‘माझे पापा खरंतर माझी प्रेरणा आहेत. आम्ही आमच्या फिटनेससाठी नेहमी घरीच अन्न बनवत असतो. आमच्याकडे प्रत्येकजण फार हेल्थ कॉन्शियस आहे. मी माझ्या किशोरवयीन वयात कधीच जीममध्ये जात नसे. मी अ‍ॅथलेटिक्समध्ये नेहमी भाग घेत असे.

हे खेळ आव्हानात्मक आणि गरजेचे असायचे. माझे वडील पंजाबी आणि आई महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला ‘व्हरायटी आॅफ फुड’ उपलब्ध असायचे. पण हे सर्व करत असतांना तेलाचा वापर, गोडाचे प्रमाण अत्यंत कमी असायचे. जेणेकरून कुणाचेही वजन वाढणार नाही.’ 

Web Title: 'Papa, my inspiration'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.