प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या पांडू यांचे कोरोनाने निधन, पत्नी आयसीयूत देतेय मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 15:40 IST2021-05-06T15:39:55+5:302021-05-06T15:40:52+5:30

पांडू यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला चांगलाच धक्का बसला आहे.

Pandu, Popular Tamil Comedian, Dies Of COVID | प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या पांडू यांचे कोरोनाने निधन, पत्नी आयसीयूत देतेय मृत्यूशी झुंज

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या पांडू यांचे कोरोनाने निधन, पत्नी आयसीयूत देतेय मृत्यूशी झुंज

ठळक मुद्देपांडू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजित कुमार यांच्या 'कढ़ल कोटाई' चित्रपटात हास्यकलाकाराची भूमिका साकारली होती.

तामीळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय हास्यकलाकार पांडू यांचे आज सकाळी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. पांडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली तर त्यांच्या पत्नीवर आयसीयूत सध्या उपचार सुरू आहेत.


 
पांडू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजित कुमार यांच्या 'कढ़ल कोटाई' चित्रपटात हास्यकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर पांडू यांनी अनेक चित्रपटात काम केलं. अभिनेता विजयच्या 'घिल्ली' चित्रपटात पांडू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. प्रेक्षकांना त्यांचं विनोदाचं टायमिंग प्रचंड आवडत असे. पांडू यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकजण सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

काही दिवसांपूर्वी पांडू आणि त्यांच्या पत्नी कुमुधा यांना करोनाची लक्षणं दिसू लागल्याने त्यांनी चाचणी केली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोघेही चेन्नईमधील एका खाजगी इस्पितळात भरती झाले. अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी त्यांच्या तब्येतीत काही फरक पडला नाही. पांडू यांचे आज निधन झाले तर त्यांची पत्नी कुमुधा यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर आयसीयूत सध्या उपचार सुरू आहेत.

Web Title: Pandu, Popular Tamil Comedian, Dies Of COVID