कार्तिक स्टारर 'भूल भुलैया-3'मध्ये पलक तिवारीची एन्ट्री? 2024 मध्ये सुरू होणार शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:39 AM2023-12-15T11:39:11+5:302023-12-15T11:42:05+5:30

'भूल भुलैया 3' चे शूटिंग फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे.

Palak Tiwari's entry in Karthik starrer 'Bhool Bhulaiya-3' | कार्तिक स्टारर 'भूल भुलैया-3'मध्ये पलक तिवारीची एन्ट्री? 2024 मध्ये सुरू होणार शूटिंग

कार्तिक स्टारर 'भूल भुलैया-3'मध्ये पलक तिवारीची एन्ट्री? 2024 मध्ये सुरू होणार शूटिंग

'भूल भुलैया' ही फ्रँचायझी प्रचंड हिट ठरली. 'भूलभुलैया 2' नंतर आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे. यावेळी या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील याचीही चाहत्यांनाही उत्सुकता आहे. आता आणखी एका अभिनेत्रीची 'भूल भुलैया 3' मध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. 

बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेत्री पलक तिवारीलाही कास्ट करण्याची चर्चा सुरू आहे. पण, अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. 'भूल भुलैया 3' चे शूटिंग फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. तिसर्‍या भागासाठी आतापर्यंत फक्त कार्तिक आर्यनचेच नाव फायनल झाले आहे. तर सारा अली खान 'भूल भुलैया 3' या चित्रपटात आर्यनसोबत कास्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.  याआधी दोघे इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज कल'मध्ये दिसले होते. या दोघांनी 2020 नंतर एकत्र कोणताही चित्रपट केलेला नाही. तर  'भूल भुलैया 2'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तब्बू या चित्रपटात दिसणार नसल्याचीही चर्चा आहे. 

'भूल भुलैया 3'  चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत त्याचे दोन्ही भाग सुपरहिट झाले आहेत. अक्षय कुमारने 'भूल भुलैया'मध्ये चौकार आणि षटकार मारले होते. तर कार्तिक आर्यनने त्याच्या सीक्वलमध्ये आपले नशीब कमावले होते. कियारा आडवाणी 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसली होती. तर पलक तिवारीने सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Web Title: Palak Tiwari's entry in Karthik starrer 'Bhool Bhulaiya-3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.