भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:30 IST2025-11-18T11:28:09+5:302025-11-18T11:30:15+5:30
एका पाकिस्तानी सिंगरने त्याच्या भर कॉन्सर्टमध्ये भारताचा ध्वज फडकावला. एवढंच नव्हे तर भारताचा झेंडा खांद्यावर घेऊन त्याने ऑन स्टेज गाणंही गायलं. पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजूमचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून सगळेच पाकिस्तानी गायकाचं कौतुक करत आहेत. एका पाकिस्तानी सिंगरने त्याच्या भर कॉन्सर्टमध्ये भारताचा ध्वज फडकावला. एवढंच नव्हे तर भारताचा झेंडा खांद्यावर घेऊन त्याने ऑन स्टेज गाणंही गायलं. पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजूमचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तल्हा अंजूमचा त्याच्या नुकत्याच नेपाळमध्ये झालेल्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसतंय की तल्हा अंजूम ऑन स्टेज गात असताना भारताचा झेंडा हातात घेतो. त्यानंतर तो झेंडा खांद्यावर घेतो आणि पुन्हा गाऊ लागतो. त्याच्या या कृतीचं कौतुक होत आहे. तर काही पाकिस्तानी चाहत्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे. कॉन्सर्टमधील या व्हिडीओवर ट्रोलिंग झाल्यानंतर तल्हा अंजूमने एक्सवर ट्वीट करत टिकेकारांना उत्तर दिलं आहे.
Pakkstani rapper Talha Anjum wore Indian flag during his performance at a concert last night in Nepal..
— Eco Vibes 🌍 (@EcoVibeExplorer) November 16, 2025
What a beautiful gesture.. pic.twitter.com/q7xHe2zbxy
"माझ्या हृदयात द्वेषाला जागा नाही. माझ्या कलेला सीमा नाही. मी भारताचा झेंडा फडकवल्याने जर वाद होत असेल तर होऊ द्या. मग मी हे पुन्हा करेन. मीडिया, युद्ध भडकवणारं सरकार आणि त्यांच्या प्रपोगंडाची मला पर्वा नाही. ऊर्दू रॅपला कधीच सीमा नव्हती आणि यापुढेही नसेल", असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कोण आहे तल्हा अंजूम?
तल्हा अंजूम हा मुळचा पाकिस्तानातील कराची येथील आहे. पाकिस्तानातील लोकप्रिय हिप-हॉप गायकांपैकी तो एक आहे. सिंगर असण्यासोबतच तो एक अभिनेतादेखील आहे. काही सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. तर सोशल मीडियावर त्याच तगडं फॅन फॉलोविंग आहे.