"बॉर्डर २ आमच्याकडे कधी रिलीज होणार?", पाकिस्तानी चाहत्याचा वरुण धवनला प्रश्न, अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:12 IST2026-01-06T16:11:46+5:302026-01-06T16:12:23+5:30
"'बॉर्डर २' पाकिस्तानात कधी रिलीज होणार? मी तारा सिंगचा खूप मोठा फॅन आहे. त्यांना माझा सलाम सांगा", असं पाकिस्तानी चाहत्याने विचारलं होतं. यावर वरुण धवनने उत्तर दिलं आहे.

"बॉर्डर २ आमच्याकडे कधी रिलीज होणार?", पाकिस्तानी चाहत्याचा वरुण धवनला प्रश्न, अभिनेता म्हणाला...
'बॉर्डर २' या सिनेमाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. वरुण धवन सिनेमात देशासाठी लढणाऱ्या सैनिक होशियार सिंग दहिया यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील गाण्यांनाही तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वरुण धवनने चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं.
यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वरुण धवनने उत्तरे दिली. एका पाकिस्तानी चाहत्यानेही वरुण धवनला 'बॉर्डर २'बद्दल प्रश्न विचारला. "'बॉर्डर २' पाकिस्तानात कधी रिलीज होणार? मी तारा सिंगचा खूप मोठा फॅन आहे. त्यांना माझा सलाम सांगा", असं पाकिस्तानी चाहत्याने विचारलं होतं. यावर वरुण धवनने उत्तर दिलं आहे. "'बॉर्डर २' हा सिनेमा १९७१ साली झालेल्या युद्धावर आणि काही सत्य घटनांवर आधारित आहे. सनी सरांचे पाकिस्तानातही चाहते आहेत याची मला खात्री आहे", असं उत्तर वरुण धवनने दिलं.
#border 2 is a film based on the 1971 war and some true events around that. I’m sure sunny sir ke pakistan mein bhi fan hain #varunsayshttps://t.co/ATeumyuRP2
— Varun Dhawan (@Varun_dvn) January 6, 2026
दरम्यान, 'बॉर्डर २' सिनेमा हा येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर म्हणजेच २३ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, वरुण धवन, मोना सिंह, सोनम बाजवा, मेधा राणा अशी स्टारकास्ट आहे. अनुराग सिंग यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.