अभिनेत्रीच्या 'त्या' किसिंग सीनमुळे वाद, लग्न करुनही स्वत:ला म्हणायची सिंगल; नवऱ्याने अशी घडवली अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:39 IST2025-08-20T13:35:09+5:302025-08-20T13:39:05+5:30
लग्न करुनही स्वत:ला म्हणायची सिंगल; नवऱ्याने अशी घडवली अद्दल, काय घडलेलं?

अभिनेत्रीच्या 'त्या' किसिंग सीनमुळे वाद, लग्न करुनही स्वत:ला म्हणायची सिंगल; नवऱ्याने अशी घडवली अद्दल
Pakistani Actreess Meera: बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मीरा. असं म्हणतात, हिंदी चित्रपटसृष्टी केव्हा कोणाचे नशीब उजळेल वा कोणाला कधी अंधारात लोटेल याचा कधीही अंदाज येत नाही. असंच काहीसं या अभिनेत्रीसोबत घडलं. मीराने अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचे पाकिस्तानबरोबर भारतातही चाहते आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'नजर' चित्रपटात मीराने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती अमिषा पटेलचा भाऊ अश्मितसोबत ती दिसली होती. मात्र, हा सिनेमा तिच्यासाठी डोकेदुखी ठरला.
किसिंग सीनमुळे मोठा वाद...
१९९५ मध्ये मीराने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. महेश भट्ट यांनी तिला पहिली संधी दिली होती. मीराचा ‘नजर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.'नजर' चित्रपटात मीरा आणि अश्मितमध्ये अनेक सिझलिंग सीन्स होते ज्यामुळे खूप वाद निर्माण झाला होता.एका किसिंग सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला त्यामुळे तो सीन चित्रपटातून काढावा लागला.मीराने मोजून ५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र ही अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षाही वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली.नझर चित्रपटादरम्यान, अमिषा पटेलचा भाऊ अश्मितसोबत तिचं नाव जोडण्यात आलं होतं. त्यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर मीरा 'कसक', 'पांच घटें में पांच करोड़', 'भड़ास', 'बंपर ड्रॉ', 'डूनो वाय 2' सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका साकारल्या. पण, तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालली नाही.
लग्न मान्य नव्हतं...
२००९ मध्ये मीराने फैसलाबाद येथील शेख अतिक-उर-रहमानशी लग्न केल होतं, असं म्हटलं जातं. त्यावेळी शेख अतिक-उर-रहमानने दावा केला होता की त्याचे मीराशी २००७ मध्ये लग्न झाले होते,परंतु अभिनेत्रीने हे लग्न नाकारले आणि व्यावसायिकाविरुद्ध खटला दाखल केला. अखेरीस २०१८ मध्ये, पुराव्यांच्या आधारे, न्यायालयाने अभिनेत्रीला अतिकची पत्नी म्हणून घोषित केलं.