पाकिस्तानी अभिनेता फिरदोस जमालने म्हटले,‘माहिरा साधारण दर्जाची मॉडेल’; फॅन्सने व्यक्त केली नाराजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 18:30 IST2019-07-28T18:28:26+5:302019-07-28T18:30:26+5:30

‘माहिरामध्ये अभिनेत्री होण्याचे कोणतेच गुण नाहीत, ती एक साधारण दर्जाची मॉडेल आहे.’ या विधानानंतर जमाल यांच्यावर फॅन्सनी प्रचंड टीका केली.

  Pakistani actor Firdous Jamal said, "Mahira is a modest model"; Fans express their displeasure! | पाकिस्तानी अभिनेता फिरदोस जमालने म्हटले,‘माहिरा साधारण दर्जाची मॉडेल’; फॅन्सने व्यक्त केली नाराजी!

पाकिस्तानी अभिनेता फिरदोस जमालने म्हटले,‘माहिरा साधारण दर्जाची मॉडेल’; फॅन्सने व्यक्त केली नाराजी!

पाकिस्तानी अभिनेता फिरदोस जमाल यांनी नुकतेच अभिनेत्री माहिरा खान हिच्याबद्दल खूपच वादग्रस्त विधान केले आहे. ‘माहिरामध्ये अभिनेत्री होण्याचे कोणतेच गुण नाहीत, ती एक साधारण दर्जाची मॉडेल आहे.’ या विधानानंतर जमाल यांच्यावर फॅन्सनी प्रचंड टीका केली. माहिरा खान ही पाकिस्तानमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि आवडती अभिनेत्री आहे. यावर माहिराने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

नुकतेच पाकिस्तानमधील एका टॉक शोमध्ये अभिनेता फिरदोस जमाल यांनी माहिरा खान हिच्याबद्दल विचारले असता म्हणाले,‘माहिरा खान हिच्यात अभिनेत्री होण्याचे कोणतेच गुण नाहीत. तिचे आता वय झाले आहे. तिच्या वयाच्या अभिनेत्रींनी एकतर आईच्या भूमिका निभावाव्यात, अभिनेत्रीच्या नाहीत. ती एक साधारण दर्जाची मॉडेल आहे.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर फॅन्सने प्रचंड नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर मते व्यक्त करायला सुरू केले. 







 

या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत ‘सनम तेरी कसम’ची अभिनेत्री मावरा होकेन यांनी म्हटले,‘ आपल्या देशाच्या एवढ्या प्रसिद्ध आणि आवडत्या अभिनेत्रीबद्दल तुम्ही असे कसे काय बोलू शकता? ही अपमानजनक टिपणी तुम्ही थांबवा, हे करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.’ यानंतर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. आता यावर माहिरा खान काय उत्तर देते, ते पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.

Web Title:   Pakistani actor Firdous Jamal said, "Mahira is a modest model"; Fans express their displeasure!