​पाकी अभिनेत्री रबी पीरजादा बरळली! सलमानवर केले गंभीर आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 13:09 IST2017-03-03T07:39:50+5:302017-03-03T13:09:50+5:30

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर ही सलमान खानविरूद्ध बरळली होती.  सलमान खान ‘छिछोरा’ असल्याचे तिने म्हटले होते. केवळ ...

Paki actress Rabi Pirzada dismisses! Salman has made serious charges !! | ​पाकी अभिनेत्री रबी पीरजादा बरळली! सलमानवर केले गंभीर आरोप!!

​पाकी अभिनेत्री रबी पीरजादा बरळली! सलमानवर केले गंभीर आरोप!!

ही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर ही सलमान खानविरूद्ध बरळली होती.  सलमान खान ‘छिछोरा’ असल्याचे तिने म्हटले होते. केवळ सलमानच नाही तर हृतिक रोशन, रितेश देशमुख यांच्याबद्दलही सबा नाही, नाही ते बोलून गेली होती. आता सबा पाठोपाठ आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीने सलमानला डिवचले आहे. होय, तिने केवळ डिवचलेच नाही तर सलमानवर गंभीर आरोपही लावला आहे. ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे, रबी पीरजादा. सलमान खानच्या चित्रपटांमुळे पाकिस्तानी युवा पिढी बिघडत असल्याचे तिने म्हटले आहे.


बॉलिवूडच्या विशेषत: सलमानच्या चित्रपटांवर तिने टीका केली आहे. सध्या पाकिस्तानात भारतीय चित्रपटांचा बोलबाला आहे. पाकिस्तानी चित्रपटांकडे पाकी प्रेक्षकच फिरकत नाहीत, याबद्दल विचारले असता, रबीने आपले ज्ञान पाजळले. बॉलिवूडचा प्रत्येक दुसरा चित्रपट क्राईम आणि हिंसक दृश्यांनी भरलेला असतो. विशेषत: सलमानच्या चित्रपटात तर हिंसक दृश्यांचा भडिमार असतो. बॉलिवूडचे लोक यातून नव्या पिढीला काय शिकवू इच्छितात, हेच मला कळत नाही. हे चित्रपट निव्वळ गुन्हेगारीला चालना देत आहेत, असे रबी म्हणाली. ती केवळ इथेच थांबली नाही तर बॉलिवूड चित्रपटांमुळे पाकिस्तानी लोकांचे अपरिमित नुकसान होत असल्याचे बोलून गेली. एक काळ असा होता, जेव्हा पाकिस्तानी सिनेमा शिखरावर होता. आपण आपल्या चित्रपटांतून समाजाला चांगल्या गोष्टी शिकवत होतो. पण बॉलिवूड चित्रपटांमुळे सगळे काही ध्वस्त झाले, असे ती म्हणाली.
 आता रबी हे का बोलली, हे ठाऊक नाही. पाकिस्तानी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ती हे सगळे बरळली.  रबी यातून केवळ फुकटची प्रसिद्धी हवी आहे, हे तर दिसतेच. कारण असे नसते तर ‘सुल्तान’, ‘बजरंगी भाईजान’ पाहिल्यानंतर कुठलीच व्यक्ति सलमानबद्दल असे बोलू शकत नाही.

Web Title: Paki actress Rabi Pirzada dismisses! Salman has made serious charges !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.